
Multibagger Mutual Funds | मागील काही महिन्यांपासून शेअर बाजाराची तेजी कायम आहे. या काळात, म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत तिप्पट परतावा मिळवून दिला आहे.
2022 हे वर्ष सुरुवातीचे काही महिने सोडले तर गुंतवणूकदारांसाठी उत्तम होते. इक्विटी म्युच्युअल फंडांनीही बाजारात जबरदस्त कामगिरी केली आहे. 24 सप्टेंबर 2021 रोजी सेन्सेक्सने पहिल्यांदाच 60,000 चा टप्पा ओलांडून इतिहास रचला होता. शेअर बाजारातील ही तेजी प्रत्यक्षात मागील दीड वर्षांपासून सुरू आहे. या काळात म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी कालावधीत जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे ज्यात लोकांचे पैसे तिप्पट झाले आहेत.
इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मागील दीड वर्षांत 200 टक्के ते 350 टक्के पर्यंत इतका भरघोस परतावा मिळाला आहे. गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा हा त्या म्युच्युअल फंडांतील परतावा आहे, ज्यांचे AMU किमान 100 कोटी रुपये पेक्षा जास्त आहे. आम्ही या लेखात तुम्हाला अश्या म्युच्युअल फंडांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी मागील दीड वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा दिला आहे.
* क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : दीड वर्षात 325 टक्के परतावा
* ICICI प्रू टेक्नॉलॉजी म्युच्युअल फंड योजना : सुमारे 304 टक्के परतावा
* आदित्य बिर्ला डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड योजना : सुमारे 254 टक्के परतावा
* टाटा डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड योजना : सुमारे 250 टक्के परतावा
* क्वांट टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड योजना : सुमारे 248 टक्के परतावा
* क्वांट अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना : सुमारे 230 टक्के परतावा
* पीजीआयएम इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड योजना : सुमारे 235 टक्के परतावा
* निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : सुमारे 221 टक्के परतावा
* कोटक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना कोटक : सुमारे 219 टक्के परतावा
* SBI टेक्नॉलॉजी म्युच्युअल फंड योजना : 20 टक्के पेक्षा जास्त परतावा
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.