
Stock To Buy | ऑगस्ट 2022 हा या वर्षातील शेअर बाजारातील सर्वात अस्थिर महिन्यांपैकी एक आहे. अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ट्रिगर्समुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. अस्थिरतेनंतर शेअर बाजारत थोडीफार सुधारणाही दिसून आली आहे. मागील काही महिन्यात शेअर बाजारात झपाट्याने रिकव्हरी होत असताना निफ्टी निर्देशांक तब्बल 18,000 च्या जवळ जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, अशा काही कंपन्या आहेत ज्यानी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा 6 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे लवकरच बोनस शेअर्स वितरीत करणार आहेत, हे स्टॉक खरेदीची हीच एक योग्य संधी आहे.
बजाज फिनसर्व्ह :
बजाज फिनसर्व्ह हा एक लार्ज कॅप स्टॉक आहे. बजाज समूहाच्या अंतर्गत आर्थिक सेवा उद्योग करणाऱ्या अनेक व्यवसायांची ही एक होल्डिंग कंपनी आहे. कंपनी जीवन आणि आरोग्य विमा, वित्तपुरवठा आणि इतर अनेक सेवांद्वारे मालमत्ता संपादन करून कुटुंब आणि उत्पन्न संरक्षण प्रदान करते. 17,206 रुपये प्रति शेअर वर्तमान बाजार मूल्य असलेल्या कंपनीचे बाजार भांडवल 274054 कोटी रुपये आहे. हा स्टॉक लवकरच आपल्या भागधारकांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. याचा अर्थ प्रत्येक शेअरच्या मालकीसाठी तुम्हाला बोनस म्हणून 1 शेअर मोफत मिळेल.
GAIL लिमिटेड :
GAIL ही भारत सरकार अंतर्गत येणारी एक सार्वजनिक उपक्रम कंपनी आहे. ही भारतातील एक दिग्गज एकात्मिक नैसर्गिक वायू कंपनी आहे. कंपनीकडे सध्या 2,300 किमी पेक्षा जास्त लांबीचे एलपीजी पाइपलाइन, 11,500 किमी लांबीचे नैसर्गिक गॅस पाइपलाइन, सहा मोठे एलपीजी गॅस-प्रोसेसिंग युनिट्स आणि एक पेट्रोकेमिकल सुविधा केंद्र आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 60,754 कोटी रुपये आहे. शेअरची सध्याची बाजार किंमत 92.4 रुपये आहे. हा स्टॉक 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. याचा अर्थ तुमच्या मालकीच्या प्रत्येक 2 शेअर्समागे तुम्हाला बोनस म्हणून 1 शेअर मोफत दिला जाईल.
आरईसी लिमिटेड :
आरईसी लिमिटेड ही ऊर्जा मंत्रालयाची केंद्रीय सार्वजनिक उपक्रम कंपनी आहे. आणि ही कंपनी वीज क्षेत्राच्या संपूर्ण मूल्य शृंखलेसह निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या सर्व प्रकल्पांना वित्तपुरवठा करते. शेअरचे सध्याचे बाजारमूल्य 105 रुपये असून बाजार भांडवल 27,741 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या भागधारकांना 1:3 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. याचा अर्थ तुमच्या मालकीच्या प्रत्येक 3 शेअर्समागे तुम्हाला बोनस म्हणून 1 शेअर मोफत दिला जाईल.
सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड :
सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे, जी जगभरातील अनेक ग्राहकांना आयटी बाबत सल्ला, उपाय आणि माहिती तंत्रज्ञान सेवा प्रदान करते. कंपनीच्या ग्राहक वर्गामध्ये युनायटेड स्टेट्स, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि भारत यांसारख्या मोठ्या देशांचा समावेश आहे. कंपनीचे बाजार भांडवल 8,209 कोटी रुपये असून , त्याचे सध्याचे बाजार मूल्य 586 रुपये आहे. ह्या कंपनीने आपल्या भागधारकांना 1:3 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहे. याचा अर्थ तुमच्या मालकीच्या प्रत्येक 3 शेअर्समागे तुम्हाला 1 शेअर बोनस मोफत दिला जाईल.
एएनजी लाइफसायन्सेस इंडिया लिमिटेड :
एएनजी लाइफसायन्सेस इंडिया लिमिटेड कंपनी निर्जंतुक ड्राय पावडर इंजेक्शनच्या वायल्सच्या डोस स्वरूपात संपूर्ण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनच्या विपणन आणि उत्पादन उद्योगमध्ये गुंतलेली आहे. शेअरचे बाजार भांडवल तब्बल 232 कोटी रुपये आहे. या शेअरची सध्याची किंमत 179 रुपये आहे. ही कंपनी आपल्या भागधारकांना 1:4 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करेल. याचा अर्थ तुमच्या मालकीच्या प्रत्येक 4 शेअर्समागे तुम्हाला बोनस म्हणून 1 मोफत दिला जाईल.
पॉन्डी ऑक्साइड्स अँड केमिकल्स लिमिटेड :
कंपनीचा मुख्य व्यवसाय अनेक प्रकारच्या शिशाच्या स्क्रॅपचे धातूच्या मिश्रणात आणि शिसेमध्ये रूपांतर करणे आहे. कंपनी लीड बॅटरी स्क्रॅप वापरून दुय्यम लीड मेटल तयार करते, जी विशिष्ट लीड्स आणि शुद्ध लीड मिश्र धातुंमध्ये रूपांतरित केली जाते. कंपनी झिंक ऑक्साईड आणि जस्त धातूच्या निर्मितीमध्ये देखील सामील आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 617 कोटी रुपये आहे. शेअरची किंमत सध्या 1,061 रुपये आहे. ही कंपनी आपल्या भागधारकांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. याचा अर्थ प्रत्येक शेअरच्या मालकीसाठी तुम्हाला बोनस म्हणून 1 शेअर मोफत मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.