
Small Savings Scheme | आजच्या महागाई च्या काळात, सर्व गुंतवणुकदारांना आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा पाहिजे असतो. आपल्याला गुंतवणुकीवर सुरक्षितता आणि हमखास परतावाही हवा असतो. गुंतवणूक बाजारात अश्या अनेक योजना आहेत, ज्या गुंतवणुकीच्या दृष्टीने जबरदस्त परतावा देणाऱ्या आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच पाच योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या दीर्घकाली भरघोस परतावा देतात, आणि आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील देतात.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
PPF मधील गुंतवणुकीवर कोणताही आयकर भरावा लागत नाही. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत, या योजनेची 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक रक्कम, व्याज परतावा करमुक्त आहे. सध्या या योजनेत गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज परतावा मिळतो. सध्या पीपीएफवर मिळणारे व्याज इतर योजनेच्या तुलनेत खूप जास्त आहे. कोणतीही बँक एवढे व्याज मुदत ठेव योजनेवर देत नाही.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम :
या योजनेत गुंतवणूक केल्यास 6.8 टक्के चक्रवाढ व्याज पद्धतीने वार्षिक परतावा दिला जातो. ही योजना हमखास परताव्याची हमी देते. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत, या योजनेतून मिळणाऱ्या परताव्यावर कर सवलत दिली जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची परिपक्वता कालावधी 5 वर्षे आहे. NSC मध्ये किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम फक्त 100 रुपये आहे. आणि कमाल गुंतवणुक रकमेची कोणतीही मर्यादा नाही. समजा जर तुम्ही या योजनेत 1000 रुपयेची गुंतवणूक केली तर, या योजनेवर मिळणाऱ्या चक्रवाढ व्याज परताव्यानुसार तुम्हाला पुढील पाच वर्षांनंतर म्हणजेच योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 1389.49 रुपयेचा परतावा मिळेल.
सुकन्या समृद्धी योजना :
ही योजना मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेला PPF प्रमाणे एक्झम्प्ट-एक्झम्प्ट-एक्झम्प्ट (EEE) चा लाभ प्राप्त आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना बँक एफडीपेक्षा जास्त म्हणजे 7.6 टक्के वार्षिक व्याज परतावा दिला जातो.
किसान विकास पत्र :
या योजनेत हमखास परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 6.9 टक्के वार्षिक व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. या योजनेचा परिपक्वता कालावधी फक्त 124 महिने आहे. या योजनेतील किमान गुंतवणूक मर्यादा 1,000 रुपये आहे. आणि कमाल गुंतवणुक रकमेची कोणतीही मर्यादा नाही. मात्र PPF आणि NSC योजनेच्या तुलनेत किसन विकास पत्र योजनेत कोणतीही कर सवलत उपलब्ध नाही.
जेष्ठ नागरिक बचत योजना :
SCSS ही योजना 60 वर्षे पूर्ण केलेल्या अश्या लोकांसाठी आहे, ज्यांना कोणत्याही प्रकारचे मासिक पेन्शन मिळत नाही, किंवा पैसे मिळवण्याचे दुसरे कोणतेही साधन नाही. असे वृध्द लोक SCSS खात्यात 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करून प्रत्येक तिमाहीत भरघोस व्याजाचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत गुंतवणूक करणारे नागरिक त्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढू शकतात. या योजनेत गुंतवलेली मूळ रक्कम मुदतपूर्तीनंतर तुम्हाला पडत केली जाईल. ज्येष्ठ नागरिक, त्यांना हवे असल्यास, मुदतपूर्ती नंतर मिळालेली रक्कम नव्याने त्याच योजनेत पुन्हा गुंतवू शकतात आणि पुन्हा व्याज परतावा मिळवू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.