28 April 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांचे तीन-तेरा, केंद्रीय मंत्री नाराज झाले

CM Eknath Shinde

MP Shrikant Shinde | राज्यातील 48 लोकसभा मतदार संघापैकी किमान 45 मतदारसंघावर कमळ फुलवण्याचा निर्धार भाजपाकडून केला जात आहे. त्याअनुशंगाने निवडणूकांचे प्लॅनिंग केले जात आहे. तर ज्या मतदार संघात भाजपाचा उमेदवार निवडून आलेला नाही, तिथे अधिकचे लक्ष देण्याचा प्रयत्न होत आहे.

भाजप आगामी लोकसभा निवडुकीत हक्काच्या अनेक जागांवर पराभूत होणार असल्याचा सर्व्ह झाल्यानंतर भाजपने कधीही न जिंकलेल्या 140 मतदारसंघांवाई डोळा ठेवला आहे आणि त्यात राज्यातील 16 मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. यात कल्याण मतदारसंघ असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत अशाच प्रकारचा दौरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीतही करणार आहेत. त्यामुळे कल्याण आणि बारामती या दोन मतदारसंघांची नावे समोर आली आहे. इतर 14 मतदारसंघ कोणते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र येत्या काळात या 16 ही लोकसभा मतदारसंघात भाजपाचे केंद्रीय मंत्री, नेते प्रवास करतील. त्यावरुन राज्यातील हे 16 मतदारसंघ कोणते, हे स्पष्ट होणार आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गट म्हणजेच शिवसेना ही एनडीएचा घटक पक्ष झाला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भाजपाच्या या 140 मतदारसंघात एनडीएतील घटक पक्षांकडे असलेल्या मतदारसंघांचा समावेश असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही या निमित्ताने कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक बांधणी उत्तम करण्याचा प्रयत्न भाजपा आणि अनुराग ठाकूर यांचा असेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात कल्याण या लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे का, ही चर्चा सुरु झाली आहे. या मतदारसंघातील कामांचा पाठपुरावाही अनुराग ठाकूर करणार असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिलेली आहे.

दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी आलं कल्याण डोंबिवली मतदार संघाला भेट दिली. यावेळी अनुराग ठाकूर यांनी रस्त्यांची अवस्था खूप खराब आहे, ही स्मार्ट सिटी आहे हे एकूण हैराण झालो अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी राबवण्यात आली तिथे आणि इथे खूप फरक आहे. मला कळलं की जेव्हा ही स्मार्ट सिटी आहे तेव्हा मीच हैराण झालो असे ठाकूर म्हणाले.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय दैनिय आहे. स्थानिकांनी यावर वेळोवेळी आवाज उठवलाय. परंतु, परिस्थिती जैसे थे आहे. आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीच येथील खराब रस्ते पाहून आपण हैराण असल्याचे म्हटले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पाहून अनुराग ठाकुर यांनी लोकप्रतीनींजवळ थेट नाराजी व्यक्त केली. अनुराग ठाकूर यांचा सध्या कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरू आहे.

मनसेने केली होती पोलखोल :
तत्पूर्वी, मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी थेट श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यासमोरच जाऊन रस्यावर असलेला खड्डा दाखवला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यापासूनच कल्याणच्या खड्ड्यांची कशी चाळण झाली आहे याचा व्हिडिओच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन बनवला होता आणि शिंदे शाहीची पोलखोल केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Union minister Anurag Thakur shocked after seen bad roads in Kalyan Dombivli loksabha constituency check details 13 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x