15 May 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Income Tax Saving | पैसा स्वतःकडे ठेवायचा आहे?, या योजनेतील गुंतवणुकीतून इन्कम टॅक्स सवलत मिळते आणि भरघोस परतावा सुद्धा मिळेल

Income Tax Savings schemes

Income Tax Saving| भारतात आयकर कायद्यांतर्गत आपल्या वार्षिक उत्पन्नावर सरकारद्वारे कर आकारला जातो. यासाठी आपण नेहमी अशी गुंतवणूक योजना शोधत असतो, ज्यात गुंतवणूक करून आपण थोडा फार कर बचत करू शकतो. जर तुम्ही अजून आयकर भरला नसेल तर तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि आयकर मध्ये सवलत मिळवा. ही योजना गुंतवणूकदारांना आयकर कायद्यांतर्गत काही प्रमाणात कर सवलत देते.

आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही आयकर सवलतीचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच, तुम्ही अशा योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावाही कमवू शकता आणि तुम्हाला कोणताही आयकर जमा करावा लागणार नाही. तुम्‍ही तुमच्‍या गुंतवणुकीवर आणि या गुंतवणुकीतून होणाऱ्या कमाईवर इन्कम टॅक्स सवलतीचा दावा करू शकता. तुम्ही जर या वर्षी आयटीआर भरला असेल पण पुढच्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे टॅक्सचे पैसे बचत करू शकता.

चला तर मग अश्याच काही योजनेचा आढावा घेऊ, ज्यातून तुम्ही भरघोस आयकर सवलत मिळवू शकता. 

सुकन्या समृद्धी योजना :
या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या कन्येच्या नावाने गुंतवणूक खाते सुरू करू शकता. 10 वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या बालिकेच्या नावाने या योजनेत आपण खाते सुरू करू शकता. या खात्यात गुंतवणुकीची किमान मर्यादा 250 रुपये आहे. फक्त 250 रुपये जमा करून आपण ह्या योजने गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला 7.6 टक्के वार्षिक दराने परतावा दिला जाईल. ह्या योजनेत मिळणारा व्याज परतावा हा मुदत ठेवीपेक्षा खूप जास्त आहे. सुकन्या समृद्धी योजना खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक केले जाऊ शकतात. किमान गुंतवणूक मर्यादा 250 रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळवू शकता. या योजनेचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा जवळच्या बँक शाखेत उघडता येते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
ही एक सरकार द्वारे सं योजना असून, यात नुकताच व्याजदरात करण्यात आली आहे. सध्या PPF योजनेतील गुंतवणुकीवर सरकारकडून 8 टक्के वार्षिक व्याज परतावा दिला जातो. मागील तिमाहीत या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला फक्त 7.1 टक्के व्याज मिळत होते. आता या व्याजदरात जबरदस्त वाढ करण्यात आली आहे. या योजनेत EEE नियम लागू आहे, म्हणजेच गुंतवलेली रक्कम, मिळालेले व्याज आणि 15 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर मिळालेले पैसे पूर्णपणे करमुक्त असतात. यामध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळू शकतो.

पोस्ट ऑफिस योजना :
5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस डिपॉझिट सेविंग स्कीममध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जातो. ही गुंतवणूक योजना अगदी बँकांच्या 5 वर्षांच्या मुदत ठेव योजनेसारखी आहे. मात्र, या योजनेतून मिळणाऱ्या व्याज परताव्यावर तुम्हाला कोणताही आयकर भरावा लागणार नाही. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 6.7 टक्के दराने वार्षिक व्याज परतावा कमवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Income Tax Savings schemes for investment benefits on 16 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x