2 May 2024 6:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Tata Group Stocks | टाटा ग्रुपचा हा शेअर सहाव्या दिवशीही अप्पर सर्किटवर, टाटा के साथ नो घाटा, हा स्टॉक देईल मजबूत परतावा

TATA group Stock|

Tata Group Stocks | टाटा समूहाचे शेअर्स आपल्या मजबूत फंडामेंटल्ससाठी ओळखले जातात. टाटा समूहातील अनेक मल्टीबॅगरचा समावेश होतो. अशीच एक मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपनीच्या शेअरने जबरदस्त उसळी घेतली आहे. मागील 6 ट्रेडिंग सेशनपासून हा स्टॉक सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. टाटा समूहातील ह्या हॉस्पिटॅलिटी सेक्टर मधील स्टॉकचे नाव आहे “इंडियन हॉटेल्स”. टाटा समूहातील ह्या हॉस्पिटॅलिटी सेक्टर मधील स्टॉकने मागील काही काळात खूप कमालीची कामगिरी केली आहे. गेल्या एका वर्षात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. इंडियन हॉटेल्सच्या स्टॉकमध्ये इतकी भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे, की सध्या तो त्याच्या सर्वकालीन उच्चांकी पातळी किमतीवर ट्रेड करत आहे. सलग सहा ट्रेडिंग सेशनपासून हा स्टॉक विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर्सची सध्याची किंमत :
इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उघडल्याबरोबर 337.20 रुपयेच्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहोचले होते. दररोज हा स्टॉक एक नवीन उच्चांक गाठत आहे. तथापि,ही वाढ जास्त काळ राहील असे वाटत नाही, कारण थोडीफार वाढ झाली की विक्रीचा दबावही वाढू लागतो, प्रॉफिट-बुकिंग सुरू होते. हा स्टॉक काल 333.90 रुपये वर खुला झाला होते, तो दिवसा अखेर पडझड होऊन 329.85 रुपयेच्या किमतीवर आला होता.

इंडियन हॉटेल्स शेअरचा इतिहास :
2022 मध्ये बाजारात आलेल्या ह्या स्टॉकने स्थापनेपासूनच मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. वार्षिक दर वाढ प्रमाणे इंडियन हॉटेल्सच्या शेअरची किंमत सुमारे 184 रुपये वरून 337.20 रुपयेपर्यंत वाढली आहे.ह्या स्टॉक मध्ये 80 टक्के वाढ दिसून येते. मागील एका वर्षात टाटा समूहाच्या या शेअरने आपल्या भागधारकांना 120 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, शेअरमध्ये अप ट्रेंड सुरू आहे, आणि त्याला 310 रुपयांच्या पातळीवर सुरक्षित सपोर्ट लाभला आहे. बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांना 310 रुपयांच्या वर ‘बाय ऑन डिप्स’ धोरण राखण्याचा सल्ला दिला आहे, कारण अल्पावधीत शेअरमध्ये प्रति शेअर 360 रुपयांपर्यंत वाढ झालेली दिसू शकते.

शेअर प्राइस आउटलुक :
चॉइस ब्रोकिंगने जाहीर केलेल्या नोट्स नुसार “इंडियन हॉटेल्स शेअर्सची किंमत सातत्याने अप ट्रेण्ड मध्ये व्यवहार करत आहे. या स्टॉकला 337 रुपये किमतीवर किरकोळ पडझडीचा सामना करावा लागला होता, पण शेअर लवकरच सावरला. नजीकच्या काळात शेअर्स मध्ये मजबूत उसळी येऊ शकते, असे तज्ञांचे म्हणणें आहे. IIFL सिक्युरिटीज च्या सल्ल्यानुसार, “हा टाटा समूहाचा स्टॉक लवकरच 350 रुपये ते 360 रुपये पर्यंत जाऊ शकतो. स्टॉक मध्ये 335 रुपये ते 340 रुपयेच्या पातळीवर किरकोळ अडथळा आला होता, त्यातून स्टॉक सावरला असून पुढील काळात ह्यात भरघोस वाढ होताना दिसेल. बाय ऑन डिप्स हे धोरण स्वीकारून आपण स्टॉक खरेदी करू शकता असा सल्ला तज्ञ देतात. स्टॉक ची किंमत 300 रुपयेच्या वर गेल्यास हमखास खरेदी करून स्टॉप लॉस 290 रुपयेच्या पातळीवर ठेवा, असे टार्गेट तज्ञांनी दिले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| TATA group Stock of Indian Hotels limited share price return on 17 September 2022.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)indian hotel(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x