19 May 2024 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Viral Video | खोटी बंदुक घेऊन तरुणीने बँकेतील कॅश लुटली, मात्र तिच्या कृत्याचं जोरदार समर्थन केलं जातंय, कारण व्हिडिओमध्ये पहा

Viral Video

Viral Video | खोटी बनावट बंदुक घेऊन तरूणी बॅंकमध्ये पोहोचली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांना बंदूक दाखवत स्वत:च्याच अकांऊंटमधून रकमेपेक्षा जास्त पैसे काढून घेतले. आश्चर्यचकीत होण्याची गोष्टी म्हणजे, या मुलीने चोरी करताना हा व्हिडीओ लाईव्ह शुट केला होता आणि त्यावेळी लाखो लोक ते पाहत होते.

प्रकरण लेबनॉनचे आहे :
हे प्रकरण लेबनॉन येथील आहे. 28 वर्षीय एक्टिविस्ट साली हाफिज मुलांची खेळण्यातली बंदुक घेऊन बँकेत पोहोचली आहे. यावेळी या महिलेने बॅंकेच्या कर्मचाऱ्याला बंदुक दाखवत स्वत:च्याच अकांऊंटमधून 10 लाख 33 हजार रुपये काढले. मुलीच्या हातामध्ये बंदुक पाहून लोक घाबरायला लागले आणि आरडाओरडा करायला लागले. यादरम्यान मुलीने स्वतःचा एक व्हिडिओ देखील बनवला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये मुलीने केले स्पष्ट :
स्वत:च्याच चोरीचा स्वत:च व्हिडीओ बनवून तो लाईव्ह दाखवणारी हाफिज म्हणते की, मी इथे कोणाला मारण्यासाठी आले नाहीये, मला फक्त माझ्या अकाऊंटमध्ये असलेले पैसे काढायचे आहेत. पुढे म्हणाली की, माझे पैसे खुप दिवस झाले या बॅंकेत अडकून आहेत आणि मला या पैशांची खुप गरज आहे. माध्यमांनुसार हाफिजची बहिण कॅन्सरने त्रस्त असल्याचे समोर आले आहे.

3 वर्षांपासून बँकेत अडकले होते :
गेल्या 3 वर्षांपासून बँकेमध्ये हाफिजचे पैसे अडकले होते. दरवेळी त्यांना 15 हजार रुपये दिले जात होते. 2019 मध्ये लेबनॉनमध्ये सुरू झालेल्या आर्थिक संकटानंतर, बँक ठेवी 3 वर्षांसाठी गोठवण्यात आल्या आहेत मात्र अशा स्थितीत हाफिजने बंदूक दाखवून 10 लाख रुपये एकरकमी काढून घेण्याचा निर्णय घेतला.

लोकांचे हाफिजला समर्थन
व्हायरल झालेल्या व्हिडीओला लोकांनी समर्थन दर्शवले आहे. यावेळी यूजरने म्हटले की, हाफिजने कोणतेही चुकीचे कृत्य केले नाही, तिने फक्त कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी आवाज उठवला आहे. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे तिने तिच्या खात्यातून हे पैसे घेतले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना सॅम नावाच्या युजरने लिहिले आहे की, ‘आम्ही बँकेत पैसे जमा करतो जेणेकरून ते गरजेनुसार वापरता येतील, या मुलीने कोणतेही चुकीचे केले नाही, आम्ही तिच्यासोबत आहोत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Woman reached bank with fake gun forcibly withdrawn money from own account Checks details 18 September 2022.

हॅशटॅग्स

#VIDEO(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x