15 May 2024 8:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Investment Tips | या सुरक्षित गुंतवणूक योजनेकडे लोकांचा अधिक कल, हमखास परताव्यासाठी तुमच्यासाठी सुद्धा योजना योग्य ठरेल

Investment Tips

Investment Tips | LIC ने सुरू केलेली जीवन तरुण पॉलिसी ही मुलांसाठी एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक, जीवन विमा पॉलिसी आहे. एलआयसी च्या या योजनेतून तुम्हाला सुरक्षा आणि बचत असे दोन्ही वैशिष्ट्यांचे लाभ दिले जातात. तुमच्या मुलांचे भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी LIC ची ही योजना तुम्हाला मदत करू शकते. चला तर मग LIC च्या जीवन तरुण विमा पॉलिसीचा आढावा घेऊ

जीवन तरूण पॉलिसी :
जीवन तरुण विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पात्रता निकष, पॉलिसीची मुदत आणि प्रीमियम भरण्याची मुदत, कमाल विमा रकम यांवर कोणतीही मर्यादा नाही. पण या योजनेत किमान गुंतवणूक विमा रक्कमची मर्यादा 75,000 ठरवण्यात आली आहे. एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक सुरू करण्यासाठी योजनाधारकाचे किमान वय 90 दिवस असले पाहिजे. पॉलिसी सुरू करण्याची वयो मर्यादा किमान 90 दिवस ते कमाल वय 12 वर्षे ठरवण्यात आली आहे. या योजनेचा कमाल परिपक्वता कालावधी वय वर्ष 25 पर्यंत आहे. योजनेची पॉलिसी टर्म 25 वर्षे, तर प्रीमियम पेइंग टर्म म्हणजेच PPT कालावधी 20 वर्षे ठरवण्यात आला आहे. 0 ते 12 वर्षांच्या मुलासाठी पालक किंवा आजी आजोबा कोणीही या योजनेत खाते खोलून गुंतवणूक सुरू करू शकतात.

LIC जीवन तरुण पॉलिसीची वैशिष्ट्ये :
सर्व्हायव्हल बेनिफिट आणि मॅच्युरिटी बेनिफिट जीवन तरुण विमा पॉलिसीला एक लवचिक योजना बनवते. या योजनेत गुंतवणूक करताना ऑफरच्या टप्प्यावर, योजनाधारक पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मिळणाऱ्या फायद्यांचे प्रमाण निवडू शकतो. तुम्हला सर्व्हायव्हल बेनिफिट मिळवण्यासाठी चार पर्याय दिले जातील, त्यामधून एकाची निवड तुम्ही करू शकता. सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणजे 20 वर्षांच्या वयाच्या किंवा त्यानंतरच्या पॉलिसीच्या प्रथम दिनापासून दरवर्षी विमा रकमेच्या निश्चित टक्केवारीचे वार्षिक पेआउट केले जाईल.

सर्व्हायव्हल बेनिफिट उपलब्ध पर्याय :
पर्याय 1 : या पॉलिसी अंतर्गत कोणताही सर्व्हायव्हल बेनिफिट मिळणार नाही, परंतु पॉलिसी धारकाला मुदतपूर्तीवर विम्याच्या रकमेच्या 100 टक्के लाभ दिला जाईल.
पर्याय 2 : पॉलिसी धारकाला 5 वर्षांसाठी प्रत्येक वर्षी विमा रकमेच्या 5 टक्के रक्कम मिळेल, आणि विमा रकमेच्या 75 टक्के रक्कम मुदतपूर्ती लाभ म्हणून दिले जातील.
पर्याय 3 : पॉलिसी धारकास 5 वर्षांसाठी दरवर्षी विमा रकमेच्या 10 टक्के रक्कम दिली जाईल. आणि विमा रकमेच्या 50 टक्के रक्कम परिपक्वता लाभ म्हणून दिले जाईल.
पर्याय 4 : पॉलिसी धारकास 5 वर्षांसाठी प्रत्येक वर्षी विम्याच्या रकमेच्या 15 टक्के रक्कम दिली जाईल, आणि विम्याच्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून प्रदान केली जाईल.

मृत्यूनंतरचा लाभ :
पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर पॉलिसी मुदतीदरम्यान विमाधारकाच्या च्या वारसदाराला मृत्यू लाभ ची रक्कम दिली जाईल. जर पॉलिसी अंमलात असेल, आणि सर्व देय प्रीमियम वेळेवर अदा केले असतील तर वरासदाराला पॉलिसीची रक्कम अदा केली जाईल. योजना सुरू होण्याच्या तारखेपूर्वी मृत्यू झाल्यास, अतिरिक्त प्रीमियम आणि रायडर प्रीमियम्स वगळून भरलेल्या प्रीमियम्सचा परतावा व्याजाशिवाय परत केला जाईल. पोलिसी कव्हर सुरू झाल्याच्या तारखेनंतर जर योजनाधारकाचा मृत्यू झाल्यास, मृत्यूवरील विम्याची रक्कम आणि निहित प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस मृत्यू लाभ म्हणून वारसदाराला दिले जातील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips of LIC Jeevan Tarun Policy benefits on investment on 18 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x