
IPO Investment| भारतीय शेअर बाजारात बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर असा एक धमाकेदार IPO आला आहे, ज्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह भरून दिला आहे. मागील काही महिन्यांपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी जबरदस्त अस्थिरतेचा सामना केला आहे. त्यात लोकांनी भरपूर पैसे गमावले, तर काहींनी पडझडीच्या काळातही पैसे कमावले. आता शेअर बाजारात हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल चा IPO आल्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची संधी दिसत आहे.
हर्ष इंजिनियर्स इंटरनॅशनल IPO च्या शेवटच्या दिवशी 74.70 पट अधिक सबस्क्रिप्शन झाला आहेत. IPO मध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सर्वाधिक बोली लावली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनीही IPO मध्ये भरघोस प्रमाणात अर्ज केला आहे. ग्रे मार्केटमध्ये हर्षाइंजिनियर्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 240 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ग्रे मार्केट म्हणजे IPO लाँच होण्यापूर्वी कंपनीकडून शेअर्स अनधिकृतपणे गुंतवणूकदारांना विकले जातात.
प्रति शेअर किंमत :
हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक ग्रे मार्केट मध्ये 240 रुपयेच्या किमतीसह, प्रति शेअर 570 रुपयेच्या प्रीमियमवर BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. IPO मधे शेअरची इश्यू किंमत 330 प्रति शेअर आहे, आणि ग्रे मार्केट मध्ये प्रति शेअर GMP 240 रुपये आहे. एकत्रितपणे शेअर 570 रुपये किमतीवर सूचीबद्ध होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. IPO चा प्राइस बँड 314 रुपये ते 330 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे.
हर्षा इंजिनियर्सचे IPO वितरण :
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये, हर्षा इंजिनियर्सने माहिती दिली आहे की, “IPO ऑफरच्या शेवटच्या तारखेपासून सहा कामकाजाच्या दिवसात गुंतवणूकदारांना शेअर्सचे वितरण केले जाईल”. संस्थात्मक गुंतवणूकदारानी 178.3 पट शेअर्स सबस्क्राईब केले आहेत, हाय नेट वर्थ इंडिविजुअल ने शेअर 71 पत सबस्क्राईब केले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारानी 18 पट आणि कर्मचार्यांनी 12 पट रिझर्व्ह शेअर सबस्क्राइब केले आहेत. यासह, हर्षा इंटरनॅशनल चा IPO हा 2022 या वर्षातील सर्वात जास्त सबस्क्राईब झालेला IPO ठरला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.