नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांना राफेल लढाऊ विमानांचे प्रकरण भोगण्याची शक्यता प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व्यक्त करत आहेत. सदरप्रकरणी अनेक कागदपत्र आणि इतर पुरावे देखील समोर येण्यास सुरुवात झाली आहे. राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला. अनिल अंबानी यांनी राफेल करार होण्यापूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीचा धागा पकडत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राफेल विमान करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

संबंधित बैठकीबाबत महत्वपूर्ण माहिती दिलेल्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अनिल अंबानी यांनी व्यावसायिक तसेच संरक्षण अशा दोन्ही प्रकारच्या हेलिकॉप्टर्सच्या संबंधात ‘एअरबस हेलिकॉप्टर्स’सोबत काम करण्याची इच्छा त्यावेळी दर्शवली होती. या संदर्भात एक सामंजस्य करार म्हणजे ‘मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग’ तयार होत असून, भारताच्या पंतप्रधानांच्या फ्रान्स भेटीत त्यावर स्वाक्षरी केली जाण्याची शक्यता देखील त्यांनी त्या बैठकीत व्यक्त केली होती, असे कळते.

फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या अधिकृत घोषणेच्या पंधरा दिवस आधी, म्हणजे मार्च २०१५च्या चौथ्या आठवडय़ात उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जाँ-येवेस ली ड्रायन यांच्या पॅरिसमधील कार्यालयात जाऊन तेथील उच्चपदस्थ सल्लागारांशी सविस्तर बैठक घेतली. संबंधित बैठकीला ली ड्रायन यांचे विशेष सल्लागार जाँ-क्लॉद मॅलेट, त्यांचे उद्योग सल्लागार ख्रिस्तोफ सालोमन आणि औद्योगिक व्यवहारांचे तांत्रिक सल्लागार जॉफ्री बुकॉट देखील उपस्थित होते. संबंधित बैठक अत्यंत गोपनीय आणि तातडीची सूचना देऊन बोलावण्यात आली होती, असे सालोमन यांनी एका युरोपीय संरक्षण कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला सांगितले होते.

Rafale fighter jet deal pm narendra modis corrupt cast them prison rahul gandhis attack