31 May 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 31 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या LIC Share Price | कमाईची मोठी संधी! LIC स्टॉक अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, ब्रोकरेजचा रिपोर्ट NBCC Share Price | सरकारी शेअर खिसा पैशाने भरतोय, 6 महिन्यात पैसे दुप्पट, खरेदी करा PSU स्टॉक IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! कंपनी प्रचंड चर्चेत, स्वस्त शेअर खरेदी करणार? Salary EPF Money | नोकरदारांनो! तुमच्या पगारातून EPF कापला जातोय? झटपट पैसे मिळतील, अपडेट जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

Onion Price Hike | हिंदू-मुस्लिम वादात व्यस्त मतदारांसाठी आनंदाची तर महागाईने त्रासलेल्यांसाठी दुःखाची बातमी, कांद्याचा भाव रडवणार

Onion Price Hike

Onion Price Hike | देशात लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतं आहेत तशा गोदी मीडियावर हिंदू-मुस्लिम वादाच्या बातम्यांवर जोर दिला जातं आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सामान्य लोकांच्या प्रश्नांना सभांमध्ये बगल देतं असून हिंदू-मुस्लिम वादाच्या मुद्यांना उचलत आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना महागाई आणि बेरोजगारी या मुख्य मुद्द्यांपासून दूर रेटण्यासाठी गोदी मीडिया आणि सत्ताधारी धामिर्क मुद्दे उचलत आहेत.

दुसरीकडे, नवरात्र संपताच कांद्याने सामान्य लोकांना रडविण्यास सुरुवात केली आहे. फक्त दोन दिवसांत किरकोळ बाजारात तो सुमारे १० रुपयांनी महागला आहे. बहुतांश शहरांमध्ये तो ५० रुपयांच्या पुढे गेला आहे. मात्र, ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाईटवर त्याची कमाल किरकोळ किंमत ७० रुपये प्रति किलो आणि किमान किरकोळ किंमत १७ रुपये आहे.

नवरात्रीत कांद्याचा खप कमी होतो. बहुतेक हिंदू कुटुंबांमध्ये या पवित्र प्रसंगी जेवणात लसूण, कांदा वापरण्यास आखडता हात घेतला जातो. तर दुसरीकडे मटण आणि माशांचे सेवनही पूर्णपणे बंद करण्यात आलेले असते.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (https://consumeraffairs.nic.in) वेबसाइटवर दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 ऑक्टोबर 2023 रोजी राजस्थानमध्ये कांद्याचा सरासरी भाव 27 रुपयांच्या जवळपास होता. गुजरातमधील किरकोळ बाजारात कांदा सरासरी ३३ रुपये, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये ३२ रुपये दराने विकला गेला. तेलंगणा आणि चंदीगडमध्ये कांदा ३४ रुपये किलो, तर छत्तीसगड आणि हरयाणामध्ये ३५ रुपये किलो ने विकला जात आहे. मुंबईत सुद्धा किरकोळ बाजारात भाव वाढला आहे.

दिल्लीसह या राज्यांमध्ये ४० रुपयांच्या जवळपास :
राजधानी दिल्लीतील किरकोळ बाजारात कांदा ६० रुपये किलोवर पोहोचला आहे. मात्र, दिल्ली, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये त्याची सरासरी किंमत ४० रुपये आहे. नागालँड आणि सिक्कीममध्ये तो ५० रुपये तर मिझोराम आणि अंदमानमध्ये ५५ रुपयांवर पोहोचला आहे.

२४ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार देशाच्या उत्तर भागात एक किलो कांद्याचा सरासरी किरकोळ भाव ३५.५६ रुपये होता, तर पश्चिम भागात ३४.२२ रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. पूर्व भागात कांद्याचा सरासरी भाव ३४.९३ रुपये प्रति किलो, तर ईशान्य भागात ४८.३१ रुपये किलो आहे. दक्षिण भागात कांद्याला सरासरी ४१.९० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

News Title : Onion Price Hike check details on 25 October 2023.

हॅशटॅग्स

#Onion Price Hike(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x