19 May 2024 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Social Media Trending | तुम्ही अविवाहित सॉफ्टवेअर इंजिनियर आहात?, मग या विवाह संबधित जाहिरातीतील अट पाहून तुमची चिंता वाढू शकते

Social Media Trending

Social Media Trending ​​| लग्नाबद्दलच्या अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. कुठे तरी वर्ण, तर कुठे उंची, तर कुठे पगार, तर कुठेतरी जातीच्या जाहिरातींमध्ये विविध प्रकारच्या मागण्या आपण पाहतो. पण काही जाहिराती या आपल्याला आश्चर्यचकीत करतात. अशीच एक मॅट्रिमोनियल जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यातून इंजिनियर्सचे खच्चीकरण आणि फिरकी दोन्ही घेणं सुरु झालं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही जाहिरात एका वर्तमानपत्रातून आली आहे, ज्यात लिहिले आहे की, “श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील 24 वर्षीय गोरी आणि सुंदर मुलीसाठी वर शोधत आहे.” मुलगा याच जातीचा आयएएस किंवा आयपीएस अधिकारी असावा अशी कुटुंबीयांची इच्छा असून मुलगा डॉक्टर आणि बिझनेसमनही असल्यास चालेल. जाहिरातीच्या शेवटी लिहिले आहे… कृपया कोणत्याही सॉफ्टवेअर इंजिनियर्सनी फोन करू नये. जाहिरातीत करण्यात आलेल्या या आवाहनामुळे ती प्रचंड व्हायरल होत असून युजर्सना त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट उद्योगपती सुमित अरोरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, आयटीचं भविष्य इतकं चांगलं दिसत नाही. जाहिरातीत सॉफ्टवेअर इंजिनीअरला लग्नासाठी न बोलावल्याची चर्चा युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. शारिक नावाच्या एका यूजरने लिहिले की, “आम्ही इंजिनिअर्स इतके वाईट आहोत का? या व्हायरल पोस्टला आतापर्यंत 4 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Social Media Trending matrimonial proposal in newspaper trending on social media check details 21 September 2022.

हॅशटॅग्स

#Social Media Trending(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x