6 May 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

शिवसेनकडून भाजपाला धक्के, भाजपचे 12 नगरसेवक संपर्कात, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघें कार्यकर्त्यासहित शिवसेनेत

Shivsena

Shivsena ​​| युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी तळेगावात आपल्या भाषणात प्रचंड आक्रोश केला. राज्याचा खरा मुख्यमंत्री नेमका कोण आहे हेच राज्याला अजून समजलेलं नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला खोके सरकार संबोधताच उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.

दुसरीकडे, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी न्यायालयातून दसरा मेळावा मिळविल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतचे हिशोब बरोबरीत सोडविण्यास सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला मोठा धक्का दिला. मुंबई भाजपच्या उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्षा आणि अंधेरीच्या माजी नगरसेविका यांनी आज भाजपला राम-राम करुन शिवसेनेत प्रवेश केला. दिघे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि समर्थकांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी, शुक्रवारी भाजपच्या माजी नगरसेविका पुनम धनगर यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. याशिवाय भाजपचे आणखी १२ नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Former Andheri Corporator join Shivsena party at Matoshri check details 24 September 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x