13 April 2021 7:59 PM
अँप डाउनलोड

सुरतमध्ये खासगी शिकवणीच्या बसला भीषण अपघात, १० विद्यार्थ्यांचा मृत्यू

सुरत : शाळेच्या सहलीवर गेलेल्या बसला भीषण अपघात झाला असून एकूण १० विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात तब्बल ६० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. महाराष्टाच्या सीमेलगत असलेल्या गुजरातच्या डांग जिल्ह्यातील ही घटना असल्याचे वृत्त आहे. डांग येथे तब्बल ३०० फूट दरीत ही शाळेची बस कोसळली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तसेच एका खासगी शिकवणीची ही बस असल्याचे समजते. या खासगी शिकवणीत शिकणाऱ्या मुलांची ही सहल निघावी होती आणि प्रवासादरम्यान या बसला भीषण अपघात झाला आहे. पालकांमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरण आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x