3 May 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

LIC Share Price | एलआयसी गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान, पडझड थांबणार तरी कधी?, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर

LIC share Price

LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC च्या शेअरच्या शेअर्स मध्ये घसरण थांबत नाही आहे. LIC चा शेअर सूचीबद्ध झाल्यापासून ते 27 सप्टेंबर, 2022 च्या ट्रेडिंग सेशनपर्यंत नुसता पडत चालला आहे.सध्या स्टॉक खालच्या पातळीवर ट्रेड करत आहे. LIC चे शेअर्स सध्या 628.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. LIC ने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 949 रुपये ठेवली होती, आणि ज्या दिवशी स्टॉक सूचीबद्ध झाला त्यादिवसापासून ते आतापर्यंत शेअर पडतच चालला आहे.

LIC ची IPO लिस्टिंग प्राईस 34 टक्क्यांनी पडली होती. त्यानंतर परकीय गुंतवणूकदारांनी केलेल्या भरघोस विक्रीमुळे शेअर बाजारात जबरदस्त पडझड सुरू झाली असून याचा परिणाम एलआयसीच्या स्टॉकवर देखील झाला आहे. एलआयसीच्या शेअर्सची स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग झाल्यापासून स्टॉक IPO इश्यू किमतीच्या जवळही गेला नाही. एलआयसीने 949 रुपये प्रति शेअर किमतीवर आपला आयपीओ बाजारात आणला होता. एलआयसीच्या शेअरची किंमत 34 टक्के खाली म्हणजेच जवळपास 628 रुपये वर ट्रेड करत आहे. सूचीबद्ध झाल्यापासून ते आतापर्यंत गुंतवणूकदारांचे जे नुकसान झाले आहे, त्याची आकडेवारी पाहिली तर असे दिसेल की, लोकांना प्रति शेअर 321 रुपये नुकसान सहन करावा लागत आहे.

बाजारात भांडवलात कमाईची घट :
शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर LIC चे बाजार भांडवल 2 लाख कोटींनी कमी झाले आहे. LIC चे बाजार भांडवल सध्या 3.98 लाख कोटी रुपये आहे. LIC चा IPO जेव्हा बाजारात खुला झाला होता तेव्हा एलआयसीचे बाजार भांडवल 6 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ LIC च्या बाजार भांडवलात तब्बल 2 लाख कोटीची घट झाली आहे.

जी कंपनी पूर्वी शेअर बाजाराला आधार द्यायचे काम करत होती, आज तिलाच कोणता आधार राहिला नाही. LIC कंपनीने शेअर बाजाराला अडचणीच्या काळात खूप सावरण्याचे काम केले आहे. शेअर बाजाराच्या अडचणीच्या काळात जेव्हा बाजार खाली पडला तेव्हा एलआयसीने स्टॉक खरेदी करून बाजार सावरण्याचा प्रयत्न केला आहे. हेच कारण आहे की आज आपण शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या ज्या ब्लूचिप कंपन्य पाहतो त्यात एलआयसी कंपनीची खूप मोठी गुंतवणूक आहे. पण जेव्हा LIC ने आपला शेअर बाजारात आणला तेव्हा त्याच्या शेअर्सला आधार द्यायला कोणीही आले नाही. या सरकारी मालकीच्या कंपनीने आपले शेअर्स उच्च किंमतीला विकून, आयपीओद्वारे 20557 कोटी रुपये उभारले होते. परंतु गुंतवणूकदारांना आता नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे आता दररोज कमी होताना आपण पाहू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC share Price Nonstop Falling down made huge loss for Investors on 28 September 2022.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(97)Lower circuit(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x