अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी शिंदे गटाकडून भाजपच्या गुजराती उमेदवाराच्या भल्यासाठी राजकीय रडीचा डाव सुरु?, काय घेतला निर्णय?

CM Eknath Shinde | शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा जागेवरील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. इथे 3 नोव्हेंबरला मतदान आणि 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जाहीर झालेली ही पहिलीच चिन्हावरील निवडणूक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे लढाईत आता शिवसेनेच्या चिन्हाचे काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
दरम्यान, सोमवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या लिगल टीमची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटाकनं देखील उमेदवार द्यावा. उमेदवार दिला तरंच न्यायालयात बाजू मांडण्यासाठी त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. असा या चर्चेत होरा होता. म्हणूनच शिंदे गट सुद्धा अंधेरीच्या पोटनिवडणुकीत एक डमी उमेदवार देण्याची शक्यता आहे. एका चिन्हावर दोन उमेदवार दिल्याने पेच निर्माण होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल, अशी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता पुन्हा एकदा निवडणुकीवरून सामना रंगणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण, या निवडणुकीसाठी अजूनही शिंदे गटाकडे चिन्ह नाही. त्यामुळे शिंदे गट आपला डमी उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गटानेही खेळी खेळली आहे.
धनुष्यबाण चिन्ह मिळू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट न्यायालयीन लढाई लढणार आहे. न्यायालयीन लढाईत शिंदे गटाकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आणि ठाकरे गटासमोर पेच निर्माण करण्यासाठी ही चाल खेळली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. शिंदे गटाने आधीच याला पाठिंबा दिला आहे. पण अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव गटाला अडचणीत आणण्याची शिंदे गटाने रणनीती आखली आहे. पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला न्यायालयीन दणका देण्यासाठी शिंदे गटाकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
चिन्हं गोठवल्यानंतर अर्ज मागे घेणार?
पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला कोर्टामार्फत धक्का देण्यासाठी शिंदे गटाकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. मात्र चिन्हं गोठवल्यास आणि अर्ज मागे घेण्याची तारीख शिल्लक असल्यास त्यानंतर शिंदे गटाचा उमेदवार अर्ज मागे देखील घेऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गट निवडणूक जिकंण्यासाठी नव्हे तर भाजपच्या हितासाठी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात देण्यासाठी करत असल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जर अर्ज मागे घेण्याच्या कटाची कल्पना आधीच न्यायालयाला दिल्यास शिंदेंच्या सुद्धा अडचणी वाढू शकतात आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टातील लढाईत शिंदे गटाचा हाच मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Mumbai Andheri East By Poll Election Shinde Group political game check details 04 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL