13 December 2024 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

मुख्यमंत्र्यांकडून आयसोलेशन केंद्राला भेटी; तरी चंद्रकांतदादा म्हणतात त्यांनी स्वतःला घरी क्वारंटाइन केलंय

CM Uddhav Thackeray, Chandrakant Patil, Home Quarantine

कोल्हापूर, २० मे: कोरोना संसर्गनिवारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरले आहेत. त्यांनी एक नव्हे दुहेरी पीपीई किट घालून संकटाशी मुकाबला करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. गेली दोन महिने त्यांनी स्वतःला ‘मातोश्री’मध्ये क्वारंटाइन करून घेतले आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केली. दीर्घकाळ कोल्हापूर जिल्ह्यात आले नसल्याने टीका करणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली. राज्यातील करोना संकट निवरणामध्ये ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, असा टोला त्यांनी लगावला. अशा संकटसमयी ठाकरे यांनी पाय रोवून उभे राहून लोकांना धीर द्यायला हवा होता. मात्र, त्यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. लोकांना वाचवणे महत्वाचे आहे. पण त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रविण दरेकर हे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यावरून भाजप आणि शिवसेनेच चांगलच वातावरण तापलं आहे. मंत्री उदय सामंत यांनी दरेकर यांच्या दौऱ्याला आक्षेप घेतला. दरेकर आणि त्यांच्या सहकारी रेड झोन मधून आल्यामुळे आमदारांनी आधी क्वारंटाईन व्हावं. भाजप आमदारांच्याच फिरण्यामुळे कोरोना प्रसाराची भीती सामंत यानी केली व्यक्त केली तर आधी मंत्र्यांना क्वारंटाइन करा असा पलटवार भाजपचे नेते दरेकर यांनी केलाय.

तत्पूर्वी पावसाळा तोंडावर आल्याने राज्य सरकारने जास्तीत जास्त कोरोना उपचार केंद्र तयार ठेवण्यावर भर दिला आहे. स्वतः शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कोरोना उपचार केंद्रांचा प्रत्यक्ष आढावा घेतला होता. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारलेल्या १००० खाटांच्या क्षमतेच्या कोरोना काळजी केंद्राची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has failed to eradicate corona. They should go out to deal with the crisis by wearing not one but double PPE kits. For the last two months, he has quarantined himself in ‘Matoshri’, BJP state president Chandrakant Patil said here on Wednesday.

News English Title: The Chief Minister Uddhav Thackeray has Quarantined Himself In Matoshri Says Chandrakant Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x