4 May 2024 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लोकांकडून शिंदेंची ऑन कॅमेरा पोलखोल | शिंदे समर्थकांनी आम्हाला पैसे-जेवणाचं आश्वासन देऊन BKC'त आणलं आणि स्वतः फरार झाले

CM Eknath Shinde

Shivsena Dasara Melava | दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटाचा आज दसरा मेळावा होणार आहे. एकीकडे शिंदे गटाकडून बसेस, खासगी वाहनांमधून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहे. ‘उद्धव साहेबांवर या लोकांनी अन्याय केला’ असं म्हणत एका दिव्यांग शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवतीर्थावर दाखल झाले आहे. मध्य प्रदेश आणि झारखंड मधून सुद्धा काही शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहे. विशेष म्हणजे राज्यभरातून सर्व शिवसैनिक स्वखर्चाने मुंबईतील शिवाजीपार्कच्या मैदानावर मोठ्या जोशात आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवता निष्ठेने आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आजही उद्धव ठाकरे मजबूत स्थितीत आहेत असंच म्हणावं लागेल, कारण सामान्य शिवसैनिक त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. मात्र दुसरीकडे, बक्कळ आणि करोडोत खर्च करणाऱ्या शिंदे गटाची बीकेसीत जमलेली लोकच पोलखोल करत आहेत.

शिंदे गटाच्या आमदारांवर आणि पदाधिकाऱ्यांवर राज्याच्या विविध भागातून लोकांना घेऊन येण्याची जवाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांना आर्थिक रसद पुरवविण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे. मात्र अनेक लोकांना ज्यामध्ये वृद्ध पुरुष आणि महिलांची संख्या आहे त्यांनी बीकेसीत आल्यावर आलेल्या अनुभवाचं कथन प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यावर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची मेळाव्याआधीच पोलखोल झाली आहे. शिंदे समर्थकांनी आम्हाला पैसे-जेवणाचं आश्वासन देऊन BKC’त आणलं आणि स्वतः फरार झाले. आम्हाला आल्यापासून साधं पाणी देखील मिळालं नाही. मात्र आम्हाला औरंगाबादवरुन घेऊन येणारे मुंबईत आल्यावर मात्र पसार झाले आहेत. त्यामध्ये अनेकांनी थेट अब्दुल सत्तार यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे शिंदे गटाची ही ‘कृत्रिम फुगवट्याची’ धडपड किती काळ टिकणार याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

काय आहे नेमका व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Shinde Camp rally at BKC Mumbai check details 05 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x