CM Eknath Shinde | दसरा मेळाव्यातल्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. “ज्यावेळेला शिवसेनेत गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिपकलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुस्ता येणार नाही”, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर बाण मारला. विशेष म्हणजे या मेळाव्याला शिवतीर्थावरील ऐतिहासिक जनसागर लोटल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्याचवेळी बीकेसी ग्राऊंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ठाकरे कुटुंबातील अनेकांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी लांबलचक भाषण केले. यावेळी शिंदे यांचं ऐतिहासिक रटाळ भाषण सुरू असताना अर्ध्याहून अधिक लोक निघून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

एकनाथ शिंदे यांचे भाषण वेळेपेक्षा जास्त लांबल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांनी उशीर होत असल्यामुळे सभेतून काढता पाय घेतला. यापूर्वी शिंंदे गटाने परराज्यातून सभेसाठी माणसे आणल्याची चर्चा होती. तसे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला उत्तर दिले आहे. मात्र कागदावर वाचून वाचून भाषण करणाऱ्या शिंदेंच्या भाषणाला लोकं कंटाळल्याचं पाहायला मिळालं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde BKC Rally speech check details 06 October 2022.

VIDEO | मुंबई बीकेसीत एकनाथ शिंदेंनी वाचून-वाचून केलेल्या ऐतिहासिक ‘रटाळ भाषणाला’ कंटाळून लोकं निघून जाऊ लागले