29 April 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

जखमी गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू, आधी आई-वडील देवाघरी गेले, आज त्यांचं लेकरू, पब्लिसिटी आरक्षण घोषणा नव्हे तर सुरक्षा महत्वाची

Death of Govinda Prathamesh

Govinda Prathamesh Sawant | दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 22 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. प्रथमेश सावंत याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. करी रोड येथील साईभक्त क्रिडा मंडळातील जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता. मात्र आज शनिवारी त्याची प्राणज्योत मावळली.

प्रथमेश सावंतवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दहीहंडी पथकातील वरच्या थरातील गोविंदा अंगावर पडल्याने प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पाचव्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. प्रथमेश हा चुलत्यांकडे वास्तव्यास राहत होता. प्रथमेशचे आई-वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते. तो शिक्षण घेता घेता डिलिव्हरी बॉयचे देखिल काम करत होता.

प्रथमेश करी रोड येथील कामगारस्व सदन येथील चाळीत लहानपणापासून राहत आहे. प्रथमेश सावंत याचे आईवडील नसून त्याचा सांभाळ नातेवाईक करीत होते. प्रथमेशने शालेय शिक्षण हे सर्व्हिस लीगच्या शाळेतून तर बारावीचे शिक्षण एमडी महाविद्यालयात पूर्ण केले होते. त्यानंतर तो औद्योगिक प्रशिक्षण घेत होता. रोज सकाळी घरोघरी वृत्तपत्र वाटण्याचे काम करायचा. त्यानंतर दुपारी महाविद्यालयात जायता. तर संध्याकाळी पिझ्झा डिलिव्हरीचे काम तो करायचा.

शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ % आरक्षण :
त्याशिवाय, गोंविंदांना खेळाडूंचा दर्जा देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. ज्या सुविधा इतर खेळातील खेळाडूंना लागू असतात त्या सर्व सुविधा आता गोविंदांनाही लागू असतील. तसेच, राज्य सरकारने खेळाडूंना नोकऱ्यांमध्ये दिलेल्या ५ % आरक्षणाचा लाभ गोविंदांनाही मिळणार आहे. तसेच, इतर खेळांप्रमाणे गोविंदा स्पर्धाही होणार असं सांगण्यात आलं. घरातील आई-वडील वारले होते आणि आता त्यांचं लेकरू म्हणजे प्रथमेश सावंत सुद्धा देवाघरी गेला आहे. त्यामुळे तरुणांच्या सुरक्षेवर सरकारने अधिक बोलणं आणि काम करणं गरजेचं आहे. घरातील एकही व्यक्ती हयातीत राहिली नसल्याने या फिल्मी राजकीय आरक्षणाच्या घोषणेचं करायचं काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागली. कमीत कमी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी याचं भान ठेवून स्वतःचं राजकीय शौर्य दाखवण्यासाठी दहीहंडी उत्सवांमध्ये स्वतः फोडलेल्या ५० थराच्या राजकीय हंड्यांचे विक्रम सांगून केवळ पब्लिसिटी करण्यापेक्षा तरुणांच्या सुरक्षेवर अधिक भर द्यावा असं मत व्यक्त होतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Death of Govinda Prathamesh Sawant check details 08 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x