14 December 2024 2:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

बेरोजगारी व दुष्काळ या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करु नका: राज ठाकरे

Raj Thackeray, Devendra Fadanvis, Loksabha Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळ तसेच बेरोजगारी या दोन्ही महत्वाच्या गंभीर विषयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा आणि यासाठी महाराष्ट्र दिन याशिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका अशी विनंतीही मी महाराष्ट्रातील जनतेला करतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज ठाकरे यांनी बुधवारी अधिकृत ट्विट केले आहे. राज ठाकरेंनी या ट्विटमध्ये महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून पत्रक पोस्ट केले आहे. यात राज ठाकरे म्हणतात, राज्यात लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. गेले काही आठवडे एकूणच वातावरण निवडणूकमय असल्याने सर्वांचेच दुष्काळ आणि बेरोजगारी या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष झाले. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्राला या दोन संकटांकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ जास्त गंभीर आणि भीषण आहे, असे तज्ज्ञांचे मत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळत असतानाच शहरांमध्ये संघटित आणि उच्च कौशल्याधारित व्यवसायातील तरुण- तरुणी देखील त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. अनेक सरकारी आस्थापनांमध्ये पगार वेळेवर होत नसतील तर खासगी उद्योगांमध्ये काय अवस्था असेल, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. या दोन्ही विषयात सरकारने त्यांच्या कामगिरीचे पोकळ दावे करण्याच्या पलीकडे जायला हवं आणि माध्यमांनीही काटेकोरपणे या दाव्यातील तथ्य तपासायला हवे. निवडणुका येतील, जातील पण त्याच्यापलीकडे जाऊन आपल्याला या विषयांकडे बघायला हवं. सर्वच क्षेत्रात अग्रणी असलेलं राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक आहे, पण आपण वेळेत जागे झालो नाही तर हा लौकिक हातातून निसटू शकतो, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठेऊन आहेत आणि जिथे जिथे सरकारी यंत्रणा त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेत, तिथे तिथे मनसे दणका देत आहेत. पण हे दोन्ही विषय गंभीर असल्याने मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x