12 May 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Monthly Income Plan | तुम्हाला नियमित उत्पन्नाची सोय करायची आहे का? MIP मध्ये गुंतवणूक केल्यास कमी जोखमीत जास्त परतावा मिळेल

Monthly income plan

Monthly Income Plan | जर तुम्ही निवृत्तीनंतर तुमचे आयुष्य आर्थिक रित्या सुरक्षित बनवू इच्छीत असाल तर तुम्ही नियमित उत्पन्नासाठी गुंतवणुक केली पाहिजे. तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला एक ठराविक रक्कम हवी असेल तर म्युच्युअल फंडाच्या मासिक उत्पन्न योजनेत म्हणजेच एमआयपी मध्ये गुंतवणूक करणे खूप फायद्याचे राहू शकते. हा एक ओपन एंडेड म्युचुअल फंड आहे ज्याचा मोठा भाग कर्ज रोख्यामध्ये गुंतवला जातो. महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेतील गुंतवणुकीमध्ये कमी जोखीम असूनही, बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींपेक्षा यात जास्त परतावा मिळतो. जर तुम्हाला निवृत्तीच्या जवळ असताना कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करायची असेल आणि त्यातून नियमित उत्पन्न कमवायचे असेल तर तुम्ही म्युचुअल फंड MIP मध्ये गुंतवणूक करू शकता. निवृत्ती नंतर ज्यांना नियमित उत्पन्न हवे असेल अशा लोकांसाठी ही चांगली गुंतवणूक योजना आहे.

ज्या लोकांना आपल्या बचतीचा काही वाटा इक्विटी मार्केटमध्ये गुंतवायचा आहे, परंतु जोखीम घ्यायची नाही, असे लोक एमआयपीमध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकतात. ज्या लोकांना आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्न सुरू करायचे आहे, त्यांच्यासाठी म्युचुअल फंड मासिक उत्पन्न योजना फायद्याची राहील. या गुंतवणुकीतून चांगला परतावा कमावण्यासाठी आणि रोख प्रवाह कायम ठेवण्यासाठी तुम्ही आतापासून यात गुंतवणूक करू शकता.

MIP म्युच्युअल फंड कसे कार्य करते :
MIP म्युचुअल फंड योजनाना कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड असे देखील म्हणतात. या फंडपैकी सुमारे 75-90 टक्के गुंतवणूक कर्ज रोख्यामध्ये केली जाते आणि उर्वरित 10 ते 25 टक्के रक्कम इक्विटी मार्केटमध्ये गुंतवली जाते. अशा संमिश्र पोर्टफोलिओमुळे गुंतवणूकीत सुरक्षितता आणि केलेल्या गुंतवणुकीवरील परतावा यामध्ये समतोल राखला जातो. शेअर बाजारावर विपरीत परिणाम असला किंवा पडझड असली तरीही या योजनेतील परताव्यावर जास्त परिणाम होत नाही. MIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आणि लॉक-इन कालावधीही नाही. तुम्ही हवी तेवढी रक्कम दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकता.

परताव्याची हमी?
या म्युचुअल फंडातील काही भाग जो इक्विटी मार्केटमध्ये गुंतवला जातो तो कर्ज रोख्याच्या तुलनेत जास्त परतावा कमावून देतो. MIP वरील दर महिन्याला मिळणारा लाभांश पेआउट फंडाच्या प्रदर्शनावर अवलंबून असतो. परंतु इक्विटीमध्ये गुंतवलेल्या भागावर परतावा किंवा लाभांश मिळण्याची कोणतीही हमी नसते, कारण शेअर बाजाराच्या कामगिरीचा थेट परिणाम यावर होत असतो. या म्युचुअल फंड योजनेतील जो भाग इक्वीटी मार्केट मध्ये गुंतवला जातो, तो पूर्णतः बाजारातील जोखमीच्या अधीन आहे.

लाभांश परताव्यावर कर :
MIP मधून जो परतावा तुम्ही कमावणार त्यावर तुम्हाला कर भरावा लागणार आहे. म्युचुअल फंडात इक्विटीमध्ये किती भाग गुंतवला आहे आणि कर्जरोखात किती भाग गुंतवला आहे, त्यावर तुमचा कर अवलंबून राहील. बँकेच्या मुदत ठेव योजनेत किंवा पोस्ट ऑफिस योजनेत मिळणाऱ्या व्याज परतावाप्रमाणे, MIP लाभांश परताव्यावर देखील करदात्याच्या स्लॅबनुसार कर आकारला जातो. जर तुम्ही या म्युचुअल फंड MIP मध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक करत असल्यास, इंडेक्सेशननंतर भांडवली नफ्यावर तुम्हाला 20 टक्के आयकर भरावा लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Monthly income plan for regular income after retirement with high rate of return on 11 October 2022.

हॅशटॅग्स

Monthly income plan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x