16 May 2024 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Post Office Scheme | पोस्टाची नविन सरकारी स्कीम, दिवसाला 95 रुपये बचत करून परताव्यात मिळवा 14 लाख

Post Office Scheme

Post Office Scheme | पैशांची गुंतवणूक करताना अनेक जोखीम डोळ्यासमोर असताना देखील काही व्यक्ती ही जोखीम पत्करतात आणि पैसे गुंतवतात. जास्त जोखीम असते तिथे मिळणा-या सुविधा जास्त असतात. मात्र जोखीम मोठी असते. तर कमी जोखीम असलेल्या ठिकाणी पैसे सेफ असतात. मात्र मिळणा-या सवलती तुलनेने कमी असतात. आता एक शासाकीय अशी स्किम आहे जिथे तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतील आणि तुम्हाला त्यातून मोठा फायदा देखील होइल. अगदी खेडे गावातील व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

दिवसाला फक्त ९५ रुपये भरावे लागतात :
ही योजना पोस्ट ऑफिस मार्फत आहे. यात दिवसाला फक्त ९५ रुपये भरावे लागतात. सुमंगल ग्रामीण पोस्ट जीवन विमा योजना असे या योजनेचे नाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवता यावेत आणि त्यातून त्यांना जास्त फायदा मिळावा असा याचा उद्देश आहे. या मनी बॅक योजनेत गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवता येते. कमी उत्पन्न असलेल्या व्यक्ती यात सहज गुंतवणूक करू शकतात. या योजनेला केंद्र सरकारने देखील हमी दिली आहे. त्यामुळे ही पूर्णतः: सुरक्षित योजना आहे.

काही कालावधी नुसार इथे गुंतवणूक केली जाते. यात १९ ते ४० वर्षातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. तसेच मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर जमा झालेली रक्कम परत मिळते. जर त्या आधी गुतवणूकदाराचा मृत्यू झाला तर ही रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते. यासाठी १५ ते २० वर्षे हा किमान कालावधी आहे.

१५ वर्षांसाठी गुंतवणूक केली असल्यास कालावधी पूर्ण झाल्यावर ही रक्कम ६. ९ आणि १२ वर्षांनी परत केली जाते. २० टक्के रक्कम परत मिळाल्यावर उर्वरित ४० टक्के रक्कम मॅच्युरिटीवर मिळते. पॉलिसीचा कालावधी जर २० वर्षांचा असेल तर ८, १२, १६ वर्षांनी २० टक्के मनी बॅक मिळतो. तर ४० टक्के रक्कम मॅच्युरिटीवर मिळते.

उदा., गुंतवणूकदाराचे वय २५ वर्षे आहे. त्याने २० वर्षांच्या कालावधीत १ लाख रुपये गुंतवले आहेत. यासाठी त्याने दिवसाला ९५ रुपये जमा केले. मॅच्युअरिटीपर्यंत व्याजासकट ही रक्कम १४ लाख झाली आहे. तर २१ व्या वर्षी महिन्याला त्याला २६५३ रुपये दरमहा मिळतील. २० टक्के रक्कम त्याला मिळाल्यावर ४० टक्के रक्कम मॅच्युअरिटीवर मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Post Office Scheme for return around 14 Lakhs on maturity check details 13 October 2022.

हॅशटॅग्स

#Post Office Schemes(72)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x