14 December 2024 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Gautam Adani | बापरे! तुम्ही कोरोना काळात थाळ्या वाजवून नाचत असताना अदानी ग्रुप काय करत होता? फायनान्शिअल टाईम्सचा मोठा खुलासा

Gautam Adani

Gautam Adani | जानेवारी महिन्यात अमेरिकेतील शॉर्टसेलर कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत अदानी समूहाबाबत विविध माध्यमांमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता फायनान्शिअल टाईम्सच्या (एफटी लंडन) ताज्या बातमीत अदानी समूहाने कोळसा आणि कोळशापासून तयार होणारी वीज ग्राहकांना प्रचंड चढ्या किमतीत विकून वीज बिलातून वसूल केल्याचा धक्कादायक खुलासा फायनान्शिअल टाईम्सने केला आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात इंडोनेशियातून स्वस्त कोळसा समुद्रमार्गे भारतात पोहोचेपर्यंत कसा महाग करण्यात आल्या याचा खुलासा आकडेवारीसह करण्यात आला आहे.

या ताज्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने अदानी आणि हिंडेनबर्ग प्रकरणाची सुनावणी एका आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे. सर्वोच्च न्यायालयात आता शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अदानी समूहाविषयी च्या नकारात्मक अहवालाचा परिणाम त्याच्या सूचीबद्ध कंपन्यांवर झाला आणि शेअर्स मोठ्या प्रमाणात विखुरले गेले.

कोरोना काळ आणि काय आहे धक्कादायक खुलासा
फायनान्शियल टाईम्सच्या अहवालात जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२१ दरम्यानच्या चौकशीचा हवाला देण्यात आला आहे. या चौकशीत मीडिया कंपनीला असे आढळले की, अदानी समूहाने आपल्या आयात केलेल्या कोळशाच्या किंमतीत 30 शिपमेंटमध्ये 73 दशलक्ष डॉलर्सची वाढ केली होती. असा आरोप आहे की जेव्हा 30 शिपमेंट समुद्रमार्गे भारतात रवाना झाल्या तेव्हा त्यांचे निर्यात मूल्य 139 दशलक्ष डॉलर्सच्या जवळपास होते.

मात्र, भारतात येताच या 30 शिपमेंटची आयात किंमत तब्बल २१.५ कोटी डॉलर इतकी नोंदवण्यात आली, जी मूळ किमतीपेक्षा तब्बल ५२ टक्के अधिक आहे. स्वतःच स्वस्तात विकत आणलेल्या कोळशाची किंमत प्रचंड वाढवून कंपन्यांकडे वर्ग केली आणि विजेच्या माध्यमातून सामान्य लोकांकडून प्रचंड महागड्या प्रमाणात वीज बील दराच्या रूपाने वासून करून मोठा नफा कमावला असा धक्कादायक खुलासा प्रसिद्ध मीडिया हाऊसने केला आहे.

रिपोर्टनुसार, याचा थेट हेतू भारतातील वाढीव किंमतीचे समर्थन करणे हा होता. समूहातील गुप्त भागधारकांना त्याचा फायदा झाला. या देयकाच्या माध्यमातून अदानी समूहाला कदाचित कोणतेही प्रश्न टाळून वीज दरवाढीचा आधार बनण्याचा ही हेतू होता.

गुप्त चिनी भागधारकांना फायदे
अदानी समूहाला थेट फायदा झाला नसून दुबईतील टॉरस कमोडिटीज जनरल ट्रेडिंग, तैपेईतील हाय लिंगोस आणि सिंगापूरमधील पॅन एशिया ट्रेडलिंक या तीन दलालांना फायदा झाल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. ते अदानी समूहाचे गुप्त भागधारक आहेत. ऑगस्टमध्ये ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टच्या (ओसीआरपी) अहवालात हाय लिंगोसचे मालक चांग चुंग-लिंग यांचाही उल्लेख करण्यात आला होता.

News Title : Gautam Adani alleged invoicing coal imports SC defers hearing in Hindenburg case 13 October 2023.

हॅशटॅग्स

Gautam adani(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x