7 May 2024 12:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली
x

आम्हाला कमळाने फसवले! कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका: मराठा क्रांती मोर्चा

BJP, Devendra Fadanvis, Maratha Kranti Morcha

मुंबई : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आणि उमेदवार निश्चितीला वेग आलेला असताना भाजपाला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. कारण मराठा क्रांती मोर्चाने देखील लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका आहे, असे सांगत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जाहीर घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मराठा समाजावर अन्यायच केला, असे क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा, अस्ट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल, कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. यातील आरक्षणाची मागणी वगळता अन्य मागण्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी हे प्रकरण सध्या कोर्टात रखडले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मागण्या मान्य केल्या नाही तर निवडणुकीत कमळावर बहिष्कार टाकू, असा थेट इशाराच मराठा संघटनांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या मोर्चे काढून काही सुद्धा हाताला लागणार नाही, केवळ राजकीय दबाव आणणे हीच आमची मुख्य भूमिका असून प्रत्येक स्तरावर आमची फसवणूक करण्यात आली, अशी टीका या बैठकीत करण्यात आली. आम्हाला कमळाने फसवले, अशी सुमारे तीन कोटी पत्रके छापून त्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x