7 October 2022 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 08 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा Dry Brushing  | डेड स्किन काढून त्वचा बनवा चमकदार, घरीच करा ड्राय ब्रशिंग, या टिप्स फॉलो करा शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट?, भावनिक टिपण्या सुरु Mutual Funds | टॉप 10 म्युच्युअल फंड योजना ज्या गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत, त्या फंडाच्या योजना आणि यादी सेव्ह करा Penny Stocks | गुंतवणूकदारांसाठी लाईफ चेंजर ठरला हा 2 रुपयाचा शेअर, 1 लाखावर तब्बल 7 कोटी परतावा, स्टॉकबद्दल जाणून घ्या LIC Credit Card | तुमची एलआयसी पॉलिसी आहे?, घरबसल्या मिळेल फ्री LIC क्रेडिट कार्ड, अनेक फायदे मिळणार
x

कोरोनामुळे कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी सोनावणे यांचं निधन

Corona Crisis, Covid 19, Mumbai Police

मुंबई, २६ एप्रिल: कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

तत्पूर्वी, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर आणि संदीप सुर्वे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. मात्र, सरकार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.

मुंबईत एका ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी इथला रहिवासी होता. संंबंधित पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत ९६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ९६ पोलिसांत १५ अधिकाऱ्यांचा आणि ८१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ७ पोलिसांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली होती.

 

News English Summary: Shivaji Narayan Sonawane, a 56-year-old police constable of the Kurla Transport Department, has died while battling a coronavirus, according to the official Twitter handle of the Mumbai Police.

News English Title: Story One More Mumbai Police constable dead because of Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x