12 October 2024 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

लॉकडाउन वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रात अडकतील: RBI माजी गव्हर्नर

RBI Ex Governor D Subbarao

मुंबई, २७ एप्रिल: ‘लॉकडाउनचा कालावधी वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रामध्ये अडकू शकतात’ अशी शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर दुव्वूरी सुब्बाराव यांनी रविवारी व्यक्त केली. “करोना व्हायरसचे संकट संपल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा ‘व्ही’ शेपमध्ये येईल. अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल” अशी अपेक्षा सुब्बाराव यांनी व्यक्त केली.

“दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारत या संकटकाळात चांगली कामगिरी करणार हे खरं आहे. पण ही समाधानकारक बाब नाही. कारण आपला देश गरीब आहे. हे संकट असेच राहिले किंवा लॉकडाउन उठवला नाही तर, लाखो लोक गरीबींच्या चक्रामध्ये अडकू शकतात” असे सुब्बाराव म्हणाले. सदर वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

दरम्यान, नागरिकांच्या उत्पन्नावर करोना संसर्गामुळे आलेल्या मंदीचा परिणाम दिसत असून यामुळे वस्तूंच्या वापरावर आधारित मागणी मोठ्या प्रमाणावर घटणार आहे,’ याकडे भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी लक्ष वेधले आहे. लॉकडाउन संपल्यानंतरही वस्तू आणि व्यक्ती किंवा कामगार यांच्या वहनावर नियंत्रण आल्यामुळे आर्थिक उलाढाल धीम्या गतीने होणार आहे. यामुळे पुरवठा साखळी प्रभावहीन होईल, गुंतवणुकीला धीम्या गतीने चालना मिळेल, काही काळ कामगार टंचाई निर्माण होईल, कुटुंबाचे उत्पन्न घटल्यामुळे मागणी कमी होईल, असे त्यात नमूद केले आहे.

समजा करोना संसर्ग दीर्घकाळ राहिल्यास, हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी लॉकडाउन कायम राहिल्यास तसेच नवनवे हॉटस्पॉट तयार होत राहिल्यास आर्थिक हालचाल रडतखडत सुरू राहील. बऱ्याच अंशी आर्थिक उलाढाल थांबेल आणि त्याचा परिणाम म्हणून जीडीपीचा वृद्धीदर उणे ०.९ टक्क्यापर्यंत येऊ शकेल, असेही सीआयआयने म्हटले आहे.

 

News English Summary: Former Reserve Bank of India Governor Duvvuri Subbarao on Sunday said that if the lockdown period is extended, millions of Indians could fall into the cycle of poverty.

News English Title: Story Lockdown may push millions into poverty says ex RBI governor D Subbarao News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x