20 May 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
x

Post Office Scheme | यंदाची दिवाळी भरघोस पैशांनी होणार साजरी, पोस्ट ऑफिसची नविन स्कीम करेल पैशांचा वर्षाव

Post Office Scheme

Post Office Scheme | दिवाळी सणानिमित्त अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करत असतात. यात प्रत्येकाला आपला पैसा सुक्षित राहीला पाहिजे असे वाटते. यासाठी व्याजाचा दर कमी असला तरी बहूसंख्य व्यक्ती याच योजनेत पैसे गुंतवणे योग्य समजतात. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. ज्यात परतावा आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टींची हमी दिली जाते. आज या बातमीतून पोस्टाची अशीच एक खास स्कीम पाहणार आहोत.

पोस्टाच्या या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकीचे अनेक फायदे आहेत. ही योजना पोस्टाच्या एफडी प्रमाणे काम करते. टाइम डिपॉझिटच्या या योजनेत काही काळा पूर्वीच शासनाने ३० आधार पॉइंट्सने व्याज दर वाढवला होता. सध्या गुंतवणूक दाराला या योजनेतून ६.७ टक्के व्याज वर्षाला मिळते. यात विशेष बाब म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार या योजनेचा कालावधी निवडू शकता. १ ते ५ वर्षांचा या योजनेचा कालावधी आहे. तुमच्या रकमेवर व्यजाचादर कमी जास्त केला जातो.

कोण होऊ शकते लाभार्थि ?
कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत पैसे गुंतवू शकतो. त्यासाठी १,००० रुपयांच्या गुंतवणूकीपासून सुरूवात करणे गरजेचे आहे. तीन प्रौढ नागरिक एकत्र येत देखील जॉइंड अकाउंट खोलू शकतात. तुम्ही तुमच्या १० वर्षांच्या बाळासाठी त्याच्या नावानेही या योजनेत सहभागी होऊ शकता.

व्याजाचा दर ६.७ टक्के
या योजनेत पोस्टाने प्रत्येकाच्या गुंतवणूकीवर वेगवेगळे व्याज दर लावले आहेत. ६.७ टक्के या दराने व्याज हवे असेल तर तुम्हाला ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल. तर ३ वर्षांची गुंतवणूक करणा-यांना ५.८ टक्के आणि दोन वर्षांसाठी ५.७ टक्के व्याज दर लावले जातात. यात जर एक वर्षासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ५.५ टक्के व्याज मिळेल. हे सर्व व्याज दर वार्षीक आहेत.

टॅक्स नो टेन्शन
टाइम्स डिपॉझिट ही  एक उत्तम योजना आहे. यातील ५ वर्षांच्या मुदत ठेवीचा पर्याय निवडला तर तुम्हालाला कर भरण्यापासून सुटका मिळेल. कलम १९६१ च्या ८०क नुसार हा अधिकार देण्यात आला आहे. तुमचा कालावधी पूर्ण झाल्याशीवाय तुम्ही यातून पैसे काढू शकत नाही. जर कोणत्याही कारणास्तव हे पैले काढले तर दंड आकारला जातो. ५ वर्षांपेक्षा कमी काळासाठी गुंतवणूक करणा-यांना करसवलत मिळत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Scheme This Diwali will be celebrated with a lot of money the new scheme of post office will rain money 25 October 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(86)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x