2 May 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

ऑस्कर अवॉर्ड २०१९ : ‘ग्रीन बुक’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

Oscar Awards

कॅलिफोर्निया : सिनेमा जगतातील सर्वाधिक प्रतिष्टेचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाचा ऑस्कर हा ‘ग्रीन बुक’ चित्रपटानं पटकावला आहे. या सिनेमाला ऑस्करमध्ये तब्बल ५ नामांकनं होती त्यापैकी एकूण ३ पुरस्कारांवर ‘ग्रीन बुक’नं प्राप्त केले आहेत. ओरिजनल स्क्रीनप्ले, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर ‘ग्रीन बुक’ नं पटकावला आहे. पीटर फेराली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

दरम्यान, यंदाचा ऑस्कर कोणत्या सिनेमाला मिळतो याकडे संपूर्ण चित्रपट जगाचं लक्ष असत. सर्वोत्तम सिनेमाच्या शर्यतीत एकूण ८ चित्रपट होते. सुरूवातीपासूनच ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’, ‘रोमा’ , ‘ब्लॅक पँथर’मध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र बाजी ‘ग्रीन बुक’ मारली . ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ आणि ‘रोमा’ या चित्रपटानं प्रत्येकी चार ऑस्कर पटकावले आहे. तर ‘ब्लॅक पँथर’ नं एकूण ३ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.

‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ चित्रपटात फ्रेडी मर्क्युरीच्या भूमिकेत असलेल्या रॅमी मॅलेकला सर्वोत्तम अभिनेत्याचा तर ‘फेव्हरेट’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्री ओलिविया कोलमनने सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. अकरा वर्षांनतर पहिल्यांदाच स्पायडरमॅन आणि ब्लॅकपँथर या सुपरहिरोंनी ऑस्करपर्यंत मजल मारली. ‘स्पायडरमॅन’ला सर्वोत्तम ऍनिमेटेड चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे.

यंदाच्या ऑस्कर सोहळा काही दिवसांपूर्वी वादात सापडला होता. ‘दी अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’ने ४ मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मोठा वाद झाला होता. पण त्याचबरोबर १९८९ नंतर पहिल्यांदाच हा सोहळा सुत्रसंचलकाशिवाय पार पडला आहे.

हॅशटॅग्स

#Oscar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x