15 May 2024 5:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर Sakuma Share Price | श्रीमंत बनवणाऱ्या 27 रुपयाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, यापूर्वी दिला 700% परतावा Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA पुन्हा 4% वाढणार, मूळ पगारात होणार असा बदल
x

रॉबर्ट वढेरा मुरादाबादमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? पोस्टरबाजी

Priyanka Gandhi, Robert Vadra

मुरादाबाद : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर देखील मुरादाबाद युवा काँग्रेसकडून मुरादाबादच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत.

दरम्यान, मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तुमचं स्वागत आहे, अशाप्रकारचे पोस्टर येथे लावण्यात आले आहेत. मात्र, काँग्रेसकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत वृत्त काँग्रेसने प्रसिद्ध केलेलं नाही. परंतु, एक दिवसापूर्वीच खुद्द वढेरा यांनीच फेसबुक पोस्टद्वारे राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिल्याने आणि दुसऱ्याच दिवशी अशे पोस्टर मुरादाबादमध्ये दिसल्याने वढेरा निवढणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, रॉबर्ट यांच्या पत्नी प्रियंका गांधी-वढेरा यांनीही नुकताच राजकारणात प्रवेश केला असून त्यांच्यावर काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x