29 April 2024 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Penny Stocks | कंपनीचा नफा वाढला आणि 3 रुपये 90 पैशाचा पेनी शेअर वेगाने वाढतोय, हा स्टॉक खरेदी करणार?

Penny Stock

Penny Stocks | शेअर बाजारात सध्याच्या अस्थिरतेच्या काळात असे काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. स्मॉलकॅप सुपर स्पेशालिटी केमिकल कंपनी “विकास इकोटेक” ने मागील आठवड्यात सप्टेंबर तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले. यानंतर त्याच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. या केमिकल कंपनीने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 110 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

तिमाही निकालाचे परिणाम :
तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त उसळी घेतली आहे. 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2022 पर्यंत हा स्टॉक 3.40 रुपयांवरून 3.87 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. अशा प्रकारे कंपनीच्या शेअर्सनी मागील 4 दिवसात आपल्या शेअर धारकांना 14 टक्के नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी 25 ऑक्टोबर 2022 रोजी या शेअरमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकिंग दिसून आली होती. हे शेअर 3.64 टक्क्यांनी कमजोर होऊन 3.71 रुपयांवर ट्रेड करत होते.

कंपनीची कमाई :
विकास इकोटेक कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 3.50 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून गेल्या वर्षीच्या तिमहीच्या तुलनेत 400 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीची कमाई 66 लाख रुपये होती. विकास इकोटेकने जुलै-सप्टेंबर या तिमाहीत वार्षिक आधारावर 80 टक्क्यांच्या वाढीसह 13.50 कोटी रुपये कमावले होते. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 7.50 कोटी रुपये कमावले होते.

आर्थिक वर्ष 2022-2023 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4.98 कोटी रुपये होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या पेड अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये 47 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022-2023 च्या पहिल्या सहामाहीत 4.98 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून मागील वर्षी सहामाहीत कंपनीला 3.21 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता.

कंपनीबद्दल थोडक्यात :
या कंपनीचे बाजार भांडवल 353 कोटी रुपये आहे. विकास इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना 1984 मध्ये एक गैर-सरकारी कंपनी म्हणून झाली होती. ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 6.90 रुपये आहे. आणि 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1.95 रुपये होती. त्याच वेळी, विकास इकोटेक कंपनीचे मार्केट कॅप 353 कोटी रुपये आहे. हा पेनी स्टॉक सध्या 37 च्या PE मल्टिपलवर ट्रेड करत असून याचा सेक्टर PE 28.65 आहे. सध्या या स्मॉल कॅप पेनी स्टॉकची बुक व्याल्यू 2.44 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Vikas Ecotech Share price return on investment on 27 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x