15 December 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Shares Open Offer | अदानी समूहाने NDTV मधील 26 टक्के शेअर्ससाठी ओपन ऑफर जारी केली, ओपन ऑफर म्हणजे काय जाणून घ्या

Shares open offer

Shares Open Offer| अदानी समूहाने NDTV मधील 26 टक्के मालकी हक्कासाठी खुली ऑफर केली तेव्हापासून ही ओपन ऑफर ची बातमी चर्चेत आहे. ओपन ऑफरचा उद्देश कंपनीच्या भागधारकांना कंपनीच्या मालकीहक्क मध्ये बदल झाल्यास किंवा शेअर्सचे कमाल व्यवहार झाल्यास कंपनीतून बाहेर पडण्याचा पर्याय दिला जातो. अदानी समूहाने NDTV कंपनीमधील 26 टक्के शेअर्ससाठी खुली ऑफर जारी केली तेव्हापासून ही गोष्ट चर्चेत आहे.

हायलाइट्स :
* एखाद्या कंपनीला शेअर्स घेणार्‍या कंपनीकडून खुली ऑफर दिली जाऊ शकते.
* ओपन ऑफरचा वापर कंपन्या दुसर्‍या कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी करतात.
* अदानी समूहाने NDTV चे अतिरिक्त 26 टक्के शेअर्स विकत घेण्यासाठी खुली ऑफर जारी दिली आहे.

अदानी समूहाने NDTV मधील 29.18 टक्के शेअर्स अप्रत्यक्षपणे विकत घेतल्यानंतर कंपनीतील अतिरिक्त 26 टक्के शेअर्स विकत घेण्याची खुली ऑफर जारी केली आणि शेअर बाजारात खळबळ माजली. अदानी समूहाने एनडीटीव्हीला 26 टक्के शेअर्ससाठी 294 रुपये प्रति शेअर या दराने 493 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. जा निमित्ताने ओपन ऑफर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ज्याचा वापर कंपन्या दुसर्‍या कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी करतात.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI च्या म्हणण्यानुसार, एखाद्या कंपनीला दुसऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असेल तर ती कंपनी दुसऱ्या कंपनीला ओपन ऑफर देऊ शकते. जेव्हा अधिग्रहण करणारी कंपनी दुसऱ्या कंपनीच्या भागधारकांना विशिष्ट किंमतीला समभाग विकण्यासाठी आमंत्रित करते, तेव्हा त्याला ओपन ऑफर म्हणतात. ओपन ऑफरचा उद्देश कंपनीच्या भागधारकांना कंपनीच्या नियंत्रणात बदल झाल्यास किंवा समभागांचे महत्त्वपूर्ण संपादन झाल्यास कंपनीतून बाहेर पडण्याचा पर्याय दिला जातो. सोप्या शब्दात सांगायचे तर, कंपनीच्या किरकोळ भागधारकासाठी त्याचे शेअर्स त्याच्या स्वत:च्या इच्छेने नवीन गुंतवणूकदाराला पूर्व-निर्धारित किंमतीवर विकणे यालाच ओपन ऑफर म्हणतात.

ओपन ऑफरची आवश्यकता :
जेव्हा एखाद्या संस्थेने शेअर्स, मतदानाचे अधिकार किंवा दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण मिळवून ते विकत घेतले किंवा तसे करण्यास सहमती दिली असेल तेव्हा अधिग्रहण करणारी कंपनी स्टॉक खरेदी करण्यासाठी एक ओपन ऑफर देते. यासाठी सेबीने काही नियम निश्चित केले आहेत. ओपन ऑफरसाठी ऑफर देणार्‍या कंपनीने एका आर्थिक वर्षात ठरवलेल्या किमतीत कंपनीच्या 25 टक्क्यांहून अधिक शेअर्स किंवा पाच टक्क्यांहून अधिक शेअर्स किंवा मतदानाचे अधिकार आपल्याकडे घेणे गरजेचे आहे.

ओपन ऑफरमध्ये किंमत कशी ठरवली जाते?
SEBI च्या “टेकओव्हर कोड” मध्ये ओपन ऑफर देऊन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विकत घेतलेल्या शेअर्सच्या किंमतीचे सूत्र दिले आहे.

खुल्या ऑफरचे मूल्य निर्धारित करण्यासाठी चार मानके ठरवले आहेत:
(अ) किंमत 52 आठवड्यांतील शेअरच्या व्हॉल्यूम वेटेड सरासरी किंमतीपेक्षा जास्त असावी. किंवा
(ब) आधीच्या 26 आठवड्यांमध्ये अधिग्रहणकर्त्याने दिलेली सर्वोच्च किंमत खुल्या ऑफरसाठी घोषणा करावी. किंवा
(क) खुल्या ऑफरच्या घोषणेच्या 60 दिवस आधी शेअरच्या व्हॉल्यूम वेटेड सरासरी बाजारभावाच्या बरोबरीचा दर जाहीर करावा.
(ड) शेअर खरेदी करारांतर्गत सर्वाधिक वाटाघाटी केलेली किंमत निश्चित केली जावी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Shares open offer by Adani group to NDTV for take over majority stake on 25 August 2022.

हॅशटॅग्स

NDTV(1)Shares open offer(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x