
Business Idea | नोकरीचा कंटाळा आलाय आणि स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण एका साध्या आणि कधीही बंद न पडणा-या व्यवसायाची माहिती घेणार आहोत. व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतल्यावर नेमका कसला व्यवसाय करावा हाच पहिला प्रश्न असतो. अशात आपल्या खिशाला परवडेल असाच व्यवसाय आपण शोधतो.
गरिब, श्रिमंत, गाव, शहर अशा कोणत्याही ठिकाणी प्रत्येक व्यक्ती अंग स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करतात. साबन हा एक असा व्यवसाय आहे की तो कधिच बंद पडू शकत नाही. अनेक जण आपल्या आवडीनुसार सुगंधीत साबण वापरतात. यात कमी गुंतवणूक करुण तुम्ही अगदी घर बसल्या या व्यवलायाचा श्री गणेशा करू शकता. याच व्यवसायाची अधीक माहिती आज जाणून घेणार आहोत.
सरकारही करते मदत
साबण व्यवसाय हा खुप फायद्याचा ठरतो. यासाठी लागणा-या मशिन आणि इतर खर्चासाठी मोदी सरकार कर्ज देते. मोदी सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ घेत तुम्ही साबणाचा कारखाना टाकण्यासाठी कर्ज मिळवू शकता. यात तुम्हाला ८० टक्के कर्ज दिले जाते. साबण अगदी जन्मलेल्या बाळापासून सगळेच वापरतात. त्यामुळे या व्यवसायात भरपूर नफा आहे.
कोणतीही बॅंक करते मदत
साबणाचा कारखाना उभारण्यासाठी तुम्हाला १५ लाख ३० हजार रुपये इतका खर्च येऊ शकतो. यात तीन महिन्यांचे खेळते भांडवल, यंत्र सामग्री अशा गोष्टींचा समावेश आहे. १५ लाख ही रक्कम मोठी वाटत असली तरी तुम्हाला यातील फक्त ३० टक्के रक्कम गुंतववावी लागते. उर्वरीत ८० टक्के रक्कम मुद्रा योजनेतून मिळवता येते.
किती कमाई होईल?
मुद्रा योजनेचा लाभ घेत ही योजना सुरू केली तर तुम्ही वर्षाला ४ लाख किलोचे उत्पादन करू शकता. यात मिळणा-या नफ्यात दर महा ५० हजार रुपये कमवता येतील. ४ लाख किलो उत्पादना नुसार तुम्हाला ४७ लाखांचा फायदा होईल. यातील कर्ज आणि इतर खर्च वजा केल्यावर महिना तुमच्या हातात ५० हजार रुपये पडतील.
श्रेणी नुसार बणवा साबण
साबण हा विविध श्रेणीमध्ये तयार होतो. साधा, सुगंधी, कपडे, भांडी, ओषधी असे साबणाचे प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या सोईने त्यात नाविन्य आणू शकता. साबणाची असलेली मागणी आणि बाजारभाव या गोष्टी लक्षात घेऊन व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.