
Vikas Ecotech Share Price | सुपर स्पेशालिटी केमिकल्स बनवणारी विकास इकोटेक कंपनीने जबरदस्त नफा कमावला आहे. या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदार अतिशय उत्साही दिसून येत आहेत. या स्मॉल कॅप केमिकल कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 25 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. केमिकल क्षेत्रातील या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 351 कोटी रुपये आहे.
कंपनीचा नफा :
विकास इकोटेक या केमिकल कंपनीच्या नफ्यात 400 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. विकास इकोटेकने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत एकूण 3.50 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कंपनीच्या नफ्यात 400 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. विकास इकोटेक कंपनीने मागील वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत 66 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2022 चे तिमाही निकाल जाहीर झाल्यापासून विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्के वाढ दिसून आली आहे.
शेअरची किंमत 70 पैशांवरून 3.70 रुपयांवर :
विकास इकोटेकच्या शेअर्सने मागील अडीच वर्षांत जबरदस्त कामगिरी केली आहे. 9 एप्रिल 2020 रोजी या स्मॉल कॅप केमिकल कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE वर 70 पैशांवर ट्रेड करत होते. 25 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 3.71 रुपये किमतीवर पोहोचले होते. विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात 110 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या वर्षी 26 ऑक्टोबर 2022 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स BSE वर 1.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 ऑक्टोबर 2022 रोजी या केमिकल कंपनीचे शेअर्स BSE वर 3.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 6.90 रुपये होती. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1.69 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.