4 May 2025 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Rules from 1 November | 1 नोव्हेंबर पासुन सामान्यांशी संबंधित कामांमध्ये बदल होतं आहेत, महिती नसल्यास खिशाला कात्री लागेल

Rules from 1 November

Rules from 1 November | साल २०२२ मधील दिवाळी सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा झाला. अशात आता नोव्हेंबर महिना सुरू झाला असून यात तुमच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण विमा खरेदी तसेच एसपीजी, वीज बिल अशा अनेक गोष्टींचे नियम आणि दर बदलण्यात आले आहेत. त्यामुळे या बातमितून झालेले बदल आणि त्याचा सर्वसामान्यांवर कसा परिणाम होईल याविषयी जाणून घेऊ.

विमा केवायसी होणार बंधणकारक
नॉन-लाइफ इन्शुरन्सस पॉलिसी खरेदी करताना विमा नियामक मंडळाणे केवायसी बंधनकारक केली आहे. १ नोव्हेंबर पासून हा नियम सर्व पॉलिसीसाठी लागू करण्यात आला आहे. आता पर्यंत हा नियम एक लाखापेक्षा जास्त दावा असलेल्या जीवन, आरोग्य अशा योजनांसाठी होता. मात्र आता सर्वच योजनेत ते लागू झाले आहे.

ओटीपीशी कनेक्ट होणार एलपीजी
एलपीजी सिलेंडर आता पर्यंत मोबाईलवर बुक केल्यावर तो लगेचच आपल्याला मिळत होता. मात्र आता तसे होणार नाही. आता तुम्हाला एलपीजी गॅस मिळवताना मोबाईलवरून नोंदणी केल्यावर एक ओटीपी सांगितला जाईल. हा ओटीपी तुम्हाला गॅस घेऊन आलेल्या एलपीजी कर्मचा-याला सांगावा लागेल तेव्हाच तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाईल. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलेंडरचा आढावा घेतला जातो. त्यामुळे याच्या किंमतीत सातत्याने वाढ होते. त्यामुळे १ नोव्हेंबप पासून किंमतीतही बदल होण्याची शक्यता आहे.

जीएसटी परताव्यात बदल
जीएसटीमध्ये तुम्हाला मिळणा-या रिटर्णमध्ये बदल करण्यात आला आहे. यात ५ कोटींपेक्षा कमी देवाघेवाण करणा-या व्यक्तींना एक चार अंकी HSN कोड टाकावा लागेल. या आधी फक्त २ अंकी कोड होता. मात्र आता चार अंकी कोड करण्यात आला आहे. १ एप्रील पासून हा बदल झाला आहे. यात १ ऑगस्टपासून आणखीन बदल होउन सहा अंकी कोड टाकावा लागेल.

पंतप्रधान किसान योजनेच्या नियमांत बदल
या योजनेत तुमचा १२ वा इएमआय भरण्याआधी मोठा बदल करण्यात आला आहे. लाभार्थी शेतक-यांना त्यांची माहिती तपासण्याठी मोबाईल क्रमांकाची गरज लागेल. यात आधी आधार क्रमांकाच्या आधारे सर्व माहिती तपासता येत होती. मात्र आता माहिती मिळवण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे.

पाळीव प्राणी करु शकतात विमानाने प्रवास
आकासा एअर या कंपनीने पाळीव प्रण्यांना विमान प्रवासाची मुभा दिली आहे. १ नोव्हेंबर पासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यात लवकरच कार्गो सेवा सुरू होणार असल्याचीही चर्चा आहे.

एम्स रुग्णालयात मोफत ओपीडी सेवा
दिल्लीतील एम्स रुग्णालयात तुम्हाला ओपीडी कार्डसाठी शुल्क भरावे लागणार नाही. हे कार्ड आता मोफत करण्यात आले आहे. या आधी या कर्डवर ३०० रुपये युटीलीटी चार्ज आकारला जात होता. तसेच इतर ठिकाणी ओपीडीसाठी १० रुपयांचा केसपेपर घ्यावा लागत होता. मात्र आता ते शुल्क देखील माफ करण्यात आले आहे.

वीज अनुदान नोंदणी बंधनकारक
दिल्ली येथे वीज सबसिडीसाठी नविन नियम लागू करण्यात आला आहे. या अनुदाणासाठी खुप दिवस नोंदणी फॉर्म भरण्याचे काम सुरु होते. मात्र ज्यांनी अजूनही नोंदणी केली नाही. त्यांना वीड सबसिडीतून वगळण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर पासून त्यांना सबसिडी मिळणार नाही. एका महिन्यासाठी २०० युनिट वीज या नुसार मोफत हेती. मात्र आता सबसिडी नसलेल्यांना २०० युनिटचेही पैसे भरावे लागणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Rules from 1 November The cost will increase because there will be changes in various works from November 01 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Rules from 1 November(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या