21 May 2024 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक किती काळात दुप्पट होते? नफ्याचे फॉर्मुला जाणून घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme| पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनेत पैसे जमा करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो, कारण यावर भारत सरकारचे सुरक्षेची हमी दिली आहे. या योजनेत आपली गुंतवणूक सुरक्षित असते, म्हणून लोकं जास्त विचार न करता बिनधास्त आपले पैसे पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करतात. इंडिया पोस्टच्या माध्यमातून भारत सरकारने असे काही गुंतवणूकीचे पर्याय दिले आहेत, ज्यात आपण अगदी कमी जोखमीसह गुंतवणूक करू शकतो, आणि जबरदस्त रिटर्न्स कमवू शकतो. या योजनांच्या यादीत किसान विकास पत्र, 5 वर्षाची रिकरींग योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृध्दी योजना यासारख्या भरघोस परतावा कमावून देणाऱ्या योजनाचा समवेश होतो. या योजनामध्ये तुम्ही कोणत्याही जोखम शिवाय मजबूत उत्पन्न कमवू शकता.

एखाद्या गुंतवणूक योजनेत आपले पैसे किती लवकर दुप्पट होतील हे मोजण्यासाठी “फॉर्म्युला 72” चा वापर केला जातो. या सूत्रानुसार तुम्हाला किती परतावा मिळेल हे जाणून घेण्यासाठी वार्षिक व्याजदराला 72 ने भागावे लागेल. यानंतर, तुम्हाला जो अंक मिळेल तो पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की, किती काळात तुमचे पैसे दुप्पट वाढतील.

सूत्रांच्या मदतीने हिशेब समजून घेऊ की, कोणत्या योजनेत आपले पैसे किती वाढतील.

किसान विकास पत्र :
2022 मधील जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत किसान विकास पत्र योजनेत 6.90 टक्के दराने व्याज परतावा दिला जात होता. हा व्याज दर दरवर्षी स्थिर राहतो. या योजनेत आपण जर फॉर्मुला 72 च्या मदतीने मोजणी केली, तर तुमचे गुंतवलेले पैसे एकूण 124 महिन्यांत दुप्पट होतील.

पब्लिक प्रोविडेंट फंड :
पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनांपैकी एक ही योजना आहे. ही योजना आपल्या गुंतवुकदराना दर तिमाही आधारावर मजबूत व्याज परतावा कमावून देते. जर तुम्ही संपूर्ण वर्षासाठी मिळणारे समान व्याज दर फॉर्मुला 72 ने विभागले तर तुम्हाला जो 122 चा आकडा मिळेल तो तुमचे पैसे दुप्पट करण्याचा एकूण कालावधी दर्शवेल. परंतु एक गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, PPF मिळणारे व्याज दर तिमाही आधारावर निश्चित केले जातात. हे एका तिमाहीपासून दुसर्‍या तिमाहीत वाढूही शकतात किंवा कमीही होऊ शकतात.

सुकन्‍या समृद्धि योजना :
इंडिया पोस्टच्या या योजनेत गुंतवणुक केल्यास सध्या 6.6 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. या व्याजदरानुसार जर आपण फॉर्म्युला 72 च्या आधारे गणना केली तर तुमचे पैसे 113 महिन्यांत म्हणजेच 9.47 वर्षांत दुप्पट होतील. या योजनेतील गुंतवणुकीवर दिला जाणारा व्याज दर तिमाही आधारावर निश्चित केला जातो.

नेशनल सेविंग सर्टिफिकेट :
इंडिया पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक योजनेवर सध्या 6.8 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. या व्याज दरात दरवर्षी वाढ केली जाते. फॉर्मुला 72 चा वापर केल्यास आपल्याला समजेल की या गुंतवणूक योजनेत पैसे 126 महिन्यांत म्हणजेच 10.6 वर्षांत दुप्पट होतील. परंतु एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, या योजनेतील परिपक्वता कालावधी 5 वर्ष निश्चित करण्यात आला आहे.

5 वर्षांची रिकरिंग ठेव :
सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.7 टक्के दराने व्याज पस्तावा मिळतो. या व्याज दरात दरवर्षी वाढ केली जाते. या योजनेची मुदत 5 वर्ष आहे. या परिस्थितीत फॉर्मुला 72 चा वापर करून आपल्याला असे कळते की, आपण या योजनेत 5 वर्ष गुंतवणूक करून पैसे दुप्पट करू शकत नाही. कोणत्याही रकमेची गुंतवणूक मूल्य दुप्पट करण्यासाठी तुम्हाला या योजनेत 10.74 वर्ष नियमित गुंतवणूक करावी लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Scheme for investment and earning huge returns in short term with use of formula 72 on 04 November 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(86)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x