12 December 2024 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Tata Communications Share Price Today | हा मल्टिबॅगर शेअर बंपर परतावा देतो, तज्ञांनी शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली

Tata Communications Share Price  Today

Tata Communications Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात जबरदस्त परतावा दिला आहे. अशीच एक कंपनी आहे, ‘टाटा कम्युनिकेशन्स’. ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्के वाढवले आहे. 17 एप्रिल 2020 रोजी ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीचे शेअर्स 370.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के घसरणीसह 1,212.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Tata Communications Limited)

गुंतवणुकीवर परतावा :
मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 45 टक्के वाढले आहेत. मागील वर्षी जून 2022 मध्ये टाटा कम्युनिकेशन कंपनीचे शेअर्स 856 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यानंतर शेअरमध्ये ४५ टक्क्यांची शानदार सुधारणा झाली आणि शेअरची किंमत आज 1212.55 रुपये किमतीवर पोहचली. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 35,563 कोटी रुपये आहे .

डिसेंबर तिमाहीची कामगिरी :
मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीने 394 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2021 तिमाहीच्या तुलनेत नफा किंचित घटला आहे. टाटा कम्युनिकेशनच्या सेल्समध्ये 8.21 टक्के वाढ झाली असून कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये एकूण 4528.34 कोटी रुपये सेल्स केला आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी तांत्रिक चार्टवर शेअर मजबूत दिसत असल्याची माहिती दिली आहे. तज्ञांनी टाटा कम्युनिकेशन कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 1,400 रुपये आणि स्टॉप लॉस किंमत 1,230 रुपये निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Communications Share Price Today on 18 April 2023.

हॅशटॅग्स

Tata Communications Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x