18 May 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

De Nora India Share Price Today | 1 वर्षात पैसा डबल करून देखील शेअर तेजीत धावतोय, पैसे गुणाकार करणाऱ्या स्टॉकचा फायदा घेणार?

De Nora India Share Price

De Nora India Share Price Today | ‘डी नोरा इंडिया’ कंपनीच्या शेअरने अवघ्या एका वर्षामध्ये आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. मागील एका वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. या स्टॉकमध्ये आज म्हणजेच सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.28 टक्क्यांच्या वाढीसह 1,080 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.33 टक्के घसरणीसह 1,055.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (De Nora India Limited)

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी देखील डी नोरा इंडिया कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले आहेत. डी नोरा इंडिया ही कंपनी मुख्यतः स्पेशॅलिटी इलेक्ट्रो केमिकल सोल्युशन्स प्रोव्हायडर म्हणून काम करते. आणि मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 115.97 टक्के परतावा कमावून दिला आहे.

दिग्गज गुंतवणुकदार मुकुल अग्रवाल यांनी De Nora India कंपनीचे 1.37 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्यांनी मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत डी नोरा इंडिया कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.या कंपनीत मुकुल अग्रवाल यांनी एकूण 1.37 टक्के भाग भांडवल म्हणजेच 72,785 शेअर्स होल्ड केले आहेत. डी नोरा इंडिया व्यतिरिक्त, मुकुल अग्रवाल यांनी आणखी दोन स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केले होते. मुकुल अग्रवाल यांनी पायाभूत सुविधा कंपनी Capacite Infraprojects मधील 1.91 टक्के भाग भांडवल आणि विमान कंपनी Taal Enterprises मधील 8.9 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
डी नोरा इंडिया कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. अवघ्या 1 वर्षात या कंपनीचे शेअर्स 503.35 रुपयांवरून वाढून 1,078 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16.88 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 17.77 टक्के वाढली आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 20.08 टक्के मजबूत झाली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
डी नोरा इंडिया ही ‘डी नोरा’ ग्रुपची उपकंपनी असून लेक्ट्रोक्लोरिनेटर्स, कॅथोडिक प्रोटेक्शन सिस्टीम आणि कॅथोड, सरफेस फिनिशिंग, क्षेत्रात आघाडीची कंपनी मानली जाते. डी नोरा इंडिया कंपनी क्लोरी-अल्कली उद्योगासाठी पारा धातूच्या एनोड्सचे कोटिंग आणि रीकोटिंग, कॅथोड्स/एनोड्सचे कोटिंग/रीकोटिंग, आयन-एक्सचेंज आणि इलेक्ट्रोलायझर बनवण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | De Nora India Share Price Today on 18 April 2023.

हॅशटॅग्स

De Nora India Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x