CM Eknath Shinde | राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आज औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या प्रमुखांची मुलं समोरासमोर येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि दुसरीकडे, आयुष्यात कल्याण-डोंबिवलीत सुद्धा सभा न गाजवणारे शिंदे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंची सभा घेणारं आहेत. मात्र केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुश करण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार धडपडत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तर खासदार श्रीकांत शिंदेंची सायंकाळी चार वाजता सिल्लोडच्या जिल्हा परिषद ग्राउंडवर सभा घेणार आहेत. एकीकडे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाचून भाषण करण्याची शैली राज्याने पाहिली आणि समाज माध्यमांवर अक्षरशः खिल्ली उडविल्यात आली होती. त्यात शिवसेनेच्या इतिहासात कधी सभा किंवा मुद्देसूद विषयातून एखादी मुलाखत देखील न गाजवणारे खासदार श्रीकांत शिंदे केवळ वडील मुख्यमंत्री झाल्याने मोस्ट डिमांडिंग झाल्याचं पाहायला मिळतंय. काल पासून याविषयाशी संबधित वृत्तांवर त्यांची समाज माध्यमांवर खिल्ली उडवली जाऊ लागली आहे.
आधी ४० आमदारांवर टीका, मग ५० खोक्यांचा आरोप यामुळे शिवसेनेतील शिंदे-ठाकरे गट आमने-सामने आले होते. अशाच छोटा पप्पू म्हणतं सत्तार यांनी आदित्य ठाकरेंची हेटाळणी केली. तसंच मतदारसंघात येवून सभा घेऊन दाखवा हे आव्हान सत्तार यांनी दिलं होतं. मात्र आता ते आल्यावर मात्र सत्तार त्यांना जागा कशी मिळणार नाही याची काळजी घेताना दिसत आहेत. तसेच अब्दुल सत्तार हे औरंगाबादमध्ये हिंदुत्वाचा नेमका प्रचार आणि प्रसार करतात हा देखील विनोदाचा विषय बनला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MP Shrikant Shinde at Aurangabad Sillod check details 07 November 2022.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		