14 May 2025 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL
x

Multibagger Stock | 52% परतावा प्लस 500% डिव्हिडंड, नेहमी लक्षात ठेवा, डिव्हिडंड देणारे शेअर्स नफ्याचे ठरतात, स्टॉक नेम सेव्ह करा

Multibagger Stock

Multibagger Stock | ज्यूट वस्तूंचे उत्पादन करणारी ग्लोस्टर लिमिटेड ही कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्ससह लाभांश असे दुहेरी लाभ देणार आहे. ग्लोस्टर लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. याशिवाय ही कंपनी विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर 500 टक्के अंतरिम लाभांश वाटप करणार आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के पेक्षा अधिक वाढीसह 1684.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअरवर मिळणार भरघोस लाभांश :
Gloster Limited कंपनीने सोमवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तिमाही निकालासह 500 टक्के म्हणजे 50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. या कंपनीने अंतरिम लाभांश वाटपसाठी 16 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. ग्लोस्टर लिमिटेड कंपनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी आपल्या विद्यमान शेअर धारकांना अंतरिम लाभांश वितरीत करेल. या कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केली नाही. Gloster Limited कंपनीचे बाजार भांडवल 922 कोटी रुपये आहे.

शेअर्सनी आतापर्यंत दिलेला परतावा :
Gloster Limited कंपनीच्या शेअर्सनी या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 3 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 1074.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 नोव्हेंबर 2022 रोजी BSE इंडेक्सवर ग्लोस्टर लिमिटेड कंपनीचे ​​शेअर्स 1684.90 रुपयांवर ट्रेड करत होते. ग्लोस्टर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात अप्रतिम वाढ पाहायला मिळाली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत सुमारे 52 टक्के वाढली आहे. दुसरीकडे, ग्लोस्टर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील एका वर्षात 50 टक्के वधारली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Gloster Limited share price return on investment on 09 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या