4 May 2025 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK
x

Multibagger Stock | कडक! या मल्टीबॅगर स्टॉकने 3500% परतावा दिला, ब्रोकरेज हाउसेसकडून खरेदीचा सल्ला, सेव्ह स्टॉक नेम

Multibagger stock

Multibagger Stock | जर तुम्ही मूलभूत दृष्ट्या मजबूत कंपनीच्या स्टॉकमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली तर ही गुंतवणूक तुम्हाला नक्कीच जबरदस्त परतावा मिळवून देऊ शकते. असेच काहीसे विनती ऑरगॅनिक्स कंपनीच्या बाबतीत घडले आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमवून दिला आहे. मागील 10 वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 3,500 टक्क्यांचा बंपर परतावा कमावून दिला आहे. विशेष म्हणजे ब्रोकरेज हाऊसेस अजूनही या कंपनीच्या स्टॉकवर उत्साही आहेत.

विनती ऑरगॅनिक्स कंपनीने नुकताच सप्टेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून ब्रोकरेज फर्मनी या निकालाबाबत सकारात्मक विचार व्यक्त केला आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 43 टक्क्यांनी वाढला असून 116 कोटी रुपयेवर गेला आहे, जो सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 81 कोटी रुपये संकलित झाला होता. कंपनीच्या निव्वळ विक्रीत 51 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून निव्वळ विक्री 566.29 कोटी रुपयेवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत फक्त 374 कोटी रुपये होती.

उत्कृष्ट उत्पादन पोर्टफोलिओ :
शेअरखान ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअर्सबाबत म्हटले आहे की, विनती ऑरगॅनिक्स कंपनीचा ATBS/IBB सेगमेंट, विशेष उत्पादन पोर्टफोलिओ, क्षमता विस्तार/नवीन उत्पादन लॉन्च आणि विशेष रासायनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली निर्यात संधी याचा कंपनीला पुढील काळात जबरदस्त फायदा होऊ शकतो. शेअरखान फर्मने आपल्या ग्राहकांना 2,500 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर NSE वर 2,117.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तर BSE वर हा स्टॉक 2,112.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

2,300 रुपयांची टार्गेट किंमत :
शेअर बाजारातील तज्ञांनी हे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून स्टॉकसाठी 2,300 रुपयांची लक्ष किंमत दिली आहे. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, विनती ऑरगॅनिक्स ही कंपनी तिच्या कव्हरेज विश्वातील काही मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे ज्यामध्ये मजबूत ट्रॅक रेकॉर्ड, जोरदार प्रक्रिया नवकल्पना आणि चांगली आर्थिक स्थितीवर आधारित कंपनीची पुढील 5 वर्षांतील अंदाजे वाढ 25 टक्के CAGR असू शकते. नजीकच्या भविष्यात कंपनीचे मार्जिन प्रोफाइल कमजोर दिसत असले तरी या कंपनीची वाढ होताना दिसत आहे.

जिओजित फायनान्शिअल फर्मच्या मते, या कंपनीच्या महसूल वाढीचा वेग आहे तसाच कायम राहील. कंपनीच्या प्रमुख उत्पादनांची मागणी, क्षमता विस्तार आणि नवीन उत्पादनांचे उच्च योगदान विचारात घेतले तर कंपनीची वाढ तेजीत सुरूच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तज्ञांनी या स्टॉकसाठी 2,360 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली असून स्टॉक बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stock of Vinti Organics share price return on investment on 12 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या