12 May 2025 12:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार; पुढे मिळणार जरबदस्त परतावा - NSE: SUZLON IRFC Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार; मल्टिबॅगर शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRFC IREDA Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत, खरेदी करून ठेवा हा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IREDA Vedanta Share Price | मायनिंग कंपनी स्टॉक खरेदीला गर्दी, BUY रेटिंग जाहीर, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Vikas Lifecare Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलवर आला, पुढे काय होणार? अपडेट आली - NSE: VIKASLIFE
x

अखेर सोनिया गांधी आणि राहुल गुजरात निवडणूक प्रचारात, 15 दिवसांत 25 सभा, भाजपचं टेन्शन वाढलं

Gujarat Assembly Election 2022

Gujarat Assembly Election 2022 | हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आपला संपूर्ण भर मिशन गुजरातवर केंद्रीत केला आहे. याअंतर्गत येत्या 15 दिवसांत पक्षातर्फे एकूण 25 मेगा रॅली काढण्यात येणार असून, त्यात 125 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. काँग्रेसच्या या सभा आक्रमक निवडणूक रणनितीखाली असणार असून, त्यात पक्षाचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत.

काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेदेखील गुजरात निवडणुकीत प्रचारासाठी येणार आहेत. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर महाराष्ट्रात आहेत. हिमाचल प्रदेश निवडणुकीत ते प्रचारासाठी आले नव्हते, तर गुजरातमध्ये त्यांच्या आगमनाची चर्चा आहे.

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, दोन्ही मुख्यमंत्री – अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशिवाय पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याक वर्गातील बडे नेतेही येत्या काळात गुजरातमध्ये सभा आणि प्रचार करणार आहेत. यावेळीही काँग्रेसने प्रचाराची आक्रमक रणनीती आखली असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांनी राज्यात आक्रमक निवडणूक प्रचाराचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळेच काँग्रेसने भाजपला दोन आकडी (९९ जागा) आणून गेल्या तीन दशकांत सर्वोत्तम कामगिरी केली होती.

यावेळी काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीत बूथ व्यवस्थापनावर अधिक अवलंबून राहून आपली रणनीती बदलली आहे. राहुल गांधी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये द्वारका येथील राज्यस्तरीय चिंतन शिबिरात पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला होता; त्यानंतर, पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी “मूक प्रचार” योजना लागू केली. शिवाय, काँग्रेसने यावेळी घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यावर भर देणे पसंत केले आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात (1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर) होणार आहे. ८ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. आम आदमी पार्टीने भाजप आणि काँग्रेससोबत प्रवेश केल्याने गुजरातमधील निवडणूक स्पर्धा यावेळी तिरंगी झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gujarat Assembly Election 2022 congress rally management check details on 15 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gujarat Assembly Election 2022(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या