26 April 2024 8:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही आहेत | भाजप खा. अनंत कुमार हेगडेंचं वादग्रस्त वक्तव्य

BJP MP Anant Kumar Hegde, BSNL employees, MTNL Employees, Privatization

भोपाळ, ११ ऑगस्ट : केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येत असलेली भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि एमटीएनएल या दोन टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मार्च महिन्यात सभागृहात दिली होती. बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन कंपन्यांचे केंद्र सरकार खासगीकरण करणार असल्याने याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.

त्यावेळी दूरसंचार राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी सभागृहात एका प्रश्नाला उत्तर देताना माहिती दिली होती. ते म्हणाले होते, बीएसएनएलचा तोटा गेल्यावर्षी २०१९ मध्ये एप्रिल-डिसेंबरमध्ये २.५ पट वाढून तो ३९ हजार ८९ कोटी रुपये झाला आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते, कोणत्याही परिस्थितीत बीएसएनएल आणि एमटीएनएलचे खासीगकरण करण्यात येणार नाही. तोट्यात सुरू असलेल्या कंपन्यांसाठी केंद्र सरकार आर्थिक मदत देईल. गेल्यावर्षी बीएसएनएल आणि एमटीएनएलसाठी एका पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. तसेच कर्मचाऱ्यांना स्वेच्छानृत्ती घेण्यास सांगितले होते. बीएसएनएलचे जवळपास ७८,५६९ कर्मचारी आणि एमटीएनएलचे १४ हजार कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने कंपनीवर आर्थिक ओझे कमी झाले आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

दुसरीकडे बीएसएनएलच्या ८८००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाणार आहे. कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार आहे, असे अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले आहे. १० ऑगस्ट रोजी उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अनंतकुमार हेगडे म्हणाले, “बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही आहेत. जे प्रसिद्ध कंपनी विकसित करण्यासाठी काम करण्यास इच्छुक नाहीत. ८८००० हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले जाणार आहे. कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार आहे.”

दरम्यान, भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल असे विधान केले होते, यावरुन बराच वाद झाला होता. महात्मा गांधीजींनी ज्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले, ते वास्तवात आंदोलन नव्हे, तर एक नाटक होते, असे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केले होते.

याचबरोबर, अनंतकुमार हेगडे म्हणाले होते की, “या आंदोलनाचे नेतृत्त्व इंग्रजांच्या सहमतीने करण्यात आले. या कथित नेत्यांपैकी एकालाही पोलिसांनी मारले नाही. भारताला स्वातंत्र्य हे बलिदान आणि सत्याग्रहामुळे मिळाले हे काँग्रेसचे समर्थक सांगतात. पण हे सत्य नाही. इंग्रजांनी सत्याग्रहामुळे देश सोडला नव्हता.”

 

News English Summary: Former Union minister and Bharatiya Janata Party MP from Uttara Kannada Anantkumar Hegde, no stranger to controversies, has stirred up another one by calling BSNL employees ‘traitors’ and ‘anti-nationals’ who would be fired as they refused to work.

News English Title: BJP MP Anant Kumar Hegde says BSNL employees are traitors News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x