19 January 2025 6:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांसाठी चकार शब्दही काढत नाहीत - काँग्रेस

PM Narendra Modi, Maharashtra Congress, India China Fight Issue

मुंबई, १७ जून : लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

चीन सीमेवर शहीद झालेल्या २० जवानांची नावे आज सैन्य जाहीर करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनकडून सीमेच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. संभाषणातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता केवळ लडाखच नाही तर संपूर्ण एलएसीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC)वर विश्वासघात करत चीनी सैनिकांनी भारतीय जवांनावर हल्ला केल्यानंतर आता चीन चर्चेने तणाव कमी करण्याची गोष्ट बोलू लागला आहे. चीनमधीले एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, चीनी सैनिकांचे प्रवक्त्याने म्हटलं आहे की, ‘भारताने त्यांच्या सैनिकांना सख्तीने रोखलं पाहिजे. चर्चेच्या मार्गावर आलं पाहिजे.

दरम्यान, देशभरात चीनविरोधात संतापाचे वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. महाराष्ट्र काँग्रेसने यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच WeakestPMModi हा हॅशटॅगही वापरला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींवर हल्लाबोल केला आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi has not responded to the outcry against China across the country. Maharashtra Congress has targeted Prime Minister Modi over this. The Prime Minister, who tweets about small things, has left Tikastra saying that he is not ready to utter a word about the martyred soldiers.

News English Title: Maharashtra Congress has targeted Prime Minister Modi over India China Ladakha issue News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x