25 April 2024 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती | नथुराम गोडसे जिंदाबाद ट्रेंडिंगमध्ये | घातक प्रवृत्ती

Gandhi Jayanti 2020, Nathuram Godse Zindabad, Twitter trend, India

नवी दिल्ली, २ ऑक्टोबर : भारतात दरवर्षी 2 ऑक्टोबर हा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. अहिंसेच्या मार्गानं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्मा गांधीजींचा मोठा वाटा आहे. स्वतंत्रलढ्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. संपूर्ण देशात शुक्रवारी गांधीजींची 151 वी जयंती हा देश साजरी केली जाणार आहे. सत्य आणि अहिंसेबद्दल बापूंचे विचार केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन देणारे आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे.

30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला भवन येथे संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी महात्मा गांधी निघाले होते. त्याचदरम्यान नथुराम गोडसे या युवकाने त्यांच्यावर गोळी झाडली. तत्कालीन केंद्र सरकारच्या आदेशानुसार, गांधीजींच्या हत्येसंबंधीच्या सुनावणीसाठी लाल किल्ल्यावर एका विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली. येथेच झालेल्या न्यायालयीन सुनावणीत 8 जणांना दोषी ठरवण्यात आले. गोडसे आणि हत्येचा कट रचणाऱ्या नारायण आपटे या दोघांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी फाशी देण्यात आली.

मात्र आजच्या दिवशी आधुनिक भारतात समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खेदाची गोष्ट म्हणजे आज ट्विटरवर “नथुराम गोडसे झिंदाबाद” हे ट्विटरवर ट्रेंडिंग होतं असल्याचं पाहायला मिळत असून त्यावर सर्वाधिक प्रतिक्रिया उमटत आहेत. तरुणाईच्या दृष्टीने ही अत्यंत खेदाची गोष्ट असून समाज माध्यमांच्या आडून तरुणाईमध्ये एक विकृत मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

 

News English Summary: Gandhi Jayanti is celebrated on October 2 every year to mark the birth anniversary of Mahatma Gandhi. It is observed across states and territories in India, and is one of the officially declared national holidays. Gandhi Jayanti 2020 Nathuram Godse Zindabad on Twitter trend in India Marathi News LIVE latest Updates.

News English Title: Gandhi Jayanti 2020 Nathuram Godse Zindabad on Twitter trend in India Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x