
IPO Investment | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Kaynes Technologies India Limited कंपनीचा IPO 34.16 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. गुंतवणूकदारांनी या IPO ला उत्तम प्रतिसाद दिला आहे. NSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार या कंपनीच्या IPO मध्ये 1.04 कोटी शेअर्स ऑफर करण्यात आले होते, या तुलनेत 35.76 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. ग्रे मार्केटमधील या IPO ची कामगिरी पाहून गुंतवणूकदारही उत्साही झाले आहेत.
ग्रे मार्केटमधील ट्रेडिंगचे निरीक्षण करणाऱ्या तज्ञांच्या मते, Kaynes Technologies या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 138 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. ग्रे मार्केटमध्ये या शेअर्सचा हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर कंपनीचे शेअर्स जबरदस्त किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. या कंपनीने आपल्या IPO साठी प्रति शेअर 559-587 रुपये प्राइस बँड जाहीर केला होता. या कंपनीच्या IPO चे शेअर्स 17 नोव्हेंबर 2022 रोजी वाटप केले जातील. आणि त्याच वेळी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध केली जाईल.
Kaynes Technologies India Limited कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 98.47 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 21.21 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. रिटेल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 4.09 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये 530 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणले जातील. शिवाय 55,84,664 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जातील. Kaynes Technologies कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 257 कोटी रुपये भांडवल जमा केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.