29 April 2024 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Yes Bank Share Price | येस बँक AT-1 बाँड प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेलं, पुढे येस बँकेच्या शेअरचं काय होणार? अपडेट काय?

Yes Bank share price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी 0.18 टक्के वाढीसह 18.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेहनमध्ये येस बँक स्टॉक जबरदस्त पडला होता. येस बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधील बंदच्या तुलनेत 12 टक्क्यांच्या कमजोरीसह 17.35 रुपयांवर ट्रेड करत होते. शुक्रवारी येस बँक स्टॉक मध्ये पडझड झाली होती कारण, दोन वाईट बातम्या आल्या होत्या ज्याचा नकारात्मक परिणाम स्टॉकच्या किमतीवर पाहायला मिळाला होता. एकीकडे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाले आणि त्याचबरोबर AT-1 बाँड प्रकरणात येस बँकेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका मिळाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

नकारात्मक तिमाही निकालाचे परिणाम :
डिसेंबर तिमाहीमध्ये उच्च आर्थिक तरतुद केल्याने येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 79 टक्क्यांची घट झाली आहे. येस बँकेने मागील तिमाहीत 55.07 कोटी रुपये नफा कमावला आहे. येस बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बुडीत कर्जासाठी जास्तीच्या तरतुदी केल्यामुळे बँकेच्या नफ्यात घट झाली. येस बँकेच्या तिसऱ्या तिमाहीत आगाऊ वितरणामध्ये 10 टक्के वाढ आणि निव्वळ व्याज मार्जिनमध्ये 0.10 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. येस बँकेचे मूळ निव्वळ व्याज उत्पन्न 11.7 टक्क्यांच्या वाढीसह 1,971 कोटी रुपयेवर गेले आहे. येस बँकेचे बिनव्याजी उत्पन्न 55.8 टक्क्याच्या वाढीसह 1,143 कोटी रुपयेवर पोहचले आहे. कॉर्पोरेट बाँड्सची विक्री करून बँकेने 100 कोटी रुपये उत्पन्न कमावले आहे.

ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत येस बँकेच्या वार्षिक तरतुदीमध्ये 375 कोटी रुपयांवरून 845 कोटी रुपयांची वाढ केली होती. येस बँकेच्या मुख्य कार्यकारी प्रशांत कुमार यांनी माहिती दिली की, वाढलेल्या NPA मुळे येस बँकेने आर्थिक तरतूद वाढवली होती. येस बँकेने आतापर्यंत 4,300 कोटी रुपयांची कर्जे वसूली केली असून चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 1,000 कोटी रुपये कर्ज वसूली होण्याची शक्यता आहे.

येस बँक सर्वोच्च न्यायालयात जाणार :
येस बँकेने दिलेल्या माहितीनुसार, येस बँक 8,400 कोटी रुपयांच्या AT-1 बाँड प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाद्वारे 2020 साली जाहीर आदेशा विरोधात सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी जाणार आहे. येस बँकेने म्हंटले आहे की, AT-1 बाँड वाढवण्याच्या बाजूने मजबूत कायदेशीर आधार असल्याने ते सुप्रीम कोर्टात अपील करणार आहेत. जर समजा सर्वोच्च न्यायालयाने मुबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला तर, येस बँकेला जबर दणका लागू शकतो. या परिस्थितीत येस बँकेला AT-1 बाँडधारकांना बँकेचे शेअर्स द्यावे लागतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price in focus 532648 YESBANK stock market live on 24 January 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(128)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x