16 March 2025 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bima Sakhi Yojana l दहावी पास महिलांना दरमहा 7000 रुपये मिळणार, या खास सरकारी योजनेसाठी अर्ज करा Yes Bank Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या खाली घसरणार येस बँक शेअर्स, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: YESBANK Gratuity Money l 90% पगारदारांना माहित नाही किती ग्रॅच्युइटी मिळते, इथे समजून घ्या आणि नुकसान टाळा EPFO Money Alert l खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, खात्यात EPF चे 1,17,82,799 रुपये जमा होणार Budh Vakri Rashifal l यापैकी तुमची राशी कोणती, बुधाची वक्री चाल 'या' राशींना प्रचंड लाभ मिळवून देणार Horoscope Today | 16 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी रविवारचा दिवस, तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 16 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

LIC Share Price | एलआयसी कंपनीबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची मजबूत टार्गेट प्राइस जाहीर

LIC Share Price

LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी-मंदीचे चक्र पाहायला मिळाले आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स 1175 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 24 टक्के कमजोर झाले आहेत. आज मात्र या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहात. ( लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )

नुकताच भारत सरकारने एलआयसी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केली आहे. ही वेतनवाढीची मंजुरी दिल्याने भारत सरकारसह एलआयसी कंपनीवर आर्थिक बोजा पडणार आहे. तथापि, शेअरमधील घसरण ही गुंतवणुकीची संधी आहे, असे तज्ञांनी म्हंटले आहे. आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 4.08 टक्के वाढीसह 902.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

9 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी कंपनीच्या शेअर्सने 1175 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. त्यांनतर या स्टॉकमध्ये घसरण सुरू झाली होती. आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून एलआयसी स्टॉक सुमारे 25 टक्क्यांनी कमजोर झाला होता.

एलआयसी कंपनीचा IPO 949 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,62,956.42 कोटी रुपये आहे. एलआयसी स्टॉक जेव्हा 1175 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तेव्हा कंपनीचे बाजार भांडवल 7 लाख कोटी रुपये होते.

9 फेब्रुवारी 2024 पासून आतापर्यंत या कंपनीच्या बाजार भांडवलात 1.40 लाख कोटी रुपये घसरण झाली आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत, एलआयसी कंपनी भारतात रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय नंतर 7 व्या स्थानावर आली आहे.

ब्रोकरेज हाऊस कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 1300 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, जानेवारी 2024 मध्ये एलआयसी कंपनीने 14 टक्के एपीई वाढ केली आहे. तर फेब्रुवारी 2024 मध्ये कंपनीने 32 टक्के एपीई वाढ नोंदवली आहे.

नुकताच भारत सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेतनात 17 टक्के वाढ दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ कंपनीच्या 1 लाख कर्मचारी आणि 30,000 निवृत्त पेन्शनधारकांना होणार आहे. या पगारवाढीचा निर्णय 1 ऑगस्ट 2022 या तारीखपासून प्रभावी मानला जाईल.

एलआयसी कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून वेतनवाढीची बातमी जाहीर केली होती. एलआयसी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केल्याने कंपनीवर वार्षिक 4000 कोटी रुपयेचा आर्थिक बोजा पडणार आहे. यासोबतच एलआयसी कंपनीच्या स्टाफचा एकूण वेतन खर्च 29000 कोटीवर जाण्याचा अंदाज आहे. भारत सरकारने एलआयसी कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाढीसह निवृत्त झालेल्या स्टाफला म्हणजेच कंपनीच्या पेन्शनधारकांना वेतन वाढीची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 21 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x