नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत. पाकिस्तानच्या दौऱ्यावर आम्ही गेलो होतो का, नवाझ शरीफ यांना भेटायला आम्ही गेलो होतो का ?. पठाणकोटमध्ये कोण आले होते ते, ISI वाले, त्यांना आम्ही बोलावलं होतं ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षांनी मोदींना पाकिस्तानचा पोश्टर बॉय म्हटलं आहे.

दरम्यान पाकिस्तानला मोदीच गेले होते, नवाझ शरीफ यांना त्यांनीच मिठी मारली होती. स्वत:च्या शपथविधी सोहळ्याला त्यांनीच नवाझ शरीफला आमंत्रण देऊन मोठं नाटक केलं, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जळजळीत टीका केली आहे.

राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन राफेलसंदर्भात आणि राफेलच्या गायब झालेल्या फाईलींबाबत मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी एअर स्ट्राईकसंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यास उत्तर देताना मोदीच पाकिस्तानचे पोस्टर बॉय असल्याचा आरोप राहुल यांनी केला. मी त्या प्रकरणावर जास्त भाष्य करु इच्छित नाही. मात्र, कालच मी बातमी वाचली. त्यामध्ये पुलमावा हल्ल्यातील शहीद सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांनी एअर स्ट्राईकचे पुरावे मागितल्याचं म्हटलं आहे. त्या पीडित कुटुंबीयांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. काँग्रेसनेही त्याबाबत भूमिका घेतली आहे.

PM narendra modi is the real pakistans poster boy says rahul gandhi