
Multibagger Dividend | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता आणि चलबिचल पाहायला मिळत आहे. जिथे गुंतवणूकदारांना एकामागून एक जबरदस्त कंपन्यांच्या IPO मध्ये पैसे लावण्याची संधी मिळत आहे, त्याच वेळी दुसरीकडे काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याचा सपाटा सुरू केला आहे. 22 नोव्हेंबर 2022 रोजी वेदांत लिमिटेड कंपनी पुन्हा एकदा आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या पूर्वीही दोन वेळा लाभांश वाटप केला होता. आता पुन्हा एकदा कंपनीने लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. दिग्गज उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1750 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने अजूनतरी लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट जाहीर केली नाही आहे.
रेकॉर्ड तारीख :
स्टॉक एक्सचेंज नियामकला सादर केलेल्या माहितीत वेदांता कंपनीने म्हंटले आहे की, 22 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना तिसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1750 टक्के म्हणजेच प्रति शेअर 17.50 रुपये लाभांश वितरीत करणार आहे. लाभांश वाटप करण्याची तात्पुरती रेकॉर्ड तारीख 30 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.
एका शेअरच्या किमतीत 10 टक्के वाढ :
NSE निर्देशांकावर वेदांता कंपनीच्या शेअरमध्ये 0.87 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअर दिवसा अखेर 310.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किमत 10.17 टक्क्यांनी वर गेली आहे. मात्र मागील 6 महिन्यातील कमालीची अस्थिरता आणि चढ-उतारांमुळे वेदांता कंपनीचे शेअर्स केवळ 1.55 टक्के वाढू शकले होते. त्याच वेळी या वर्षाच्या सुरुवातीला ज्या गुंतवणूकदाराने या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांचे गुंतवणूक मूल्य 12.27 टक्क्यांनी घटले आहे.
यापूर्वी ही 2 अंतरिम लाभ दिले :
वेदांता लिमिटेड कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात 2 वेळा अंतरिम लाभांश वाटप केला होता. या कंपनीने मे 2022 मध्ये 31.50 रुपये आणि जुलै 2022 मध्ये 19.50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वितरीत केला. सध्या वेदांता कंपनीचे बाजार भांडवल 114192 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.